Sonam Raghuvanshi : माझे लग्न लावून दिले तर बघ मी काय करते...; सोनमने आईला दिली होती धमकी, राज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 23:50 IST2025-06-11T23:49:50+5:302025-06-11T23:50:24+5:30
Sonam - Raj Raghuvanshi Murder Case: सोनमच्या आईला राज आणि सोनमच्या प्रेमसंबंधांची माहिती होती. जर माझे दुसरीकडे लग्न लावून दिले तर त्याचा वाईट परिणाम होईल, अशी धमकी सोनमने तिला दिली होती.

Sonam Raghuvanshi : माझे लग्न लावून दिले तर बघ मी काय करते...; सोनमने आईला दिली होती धमकी, राज...
सोनम रघुवंशीने तिच्या आईला माझे लग्न लावून दिले तर बघ मी काय करते, अशा शब्दांत लग्नापूर्वी धमकावले होते, असा दावा राजा रघुवंशीचा भाऊ विपिन याने केला आहे. सोनम आणि राज यांच्या अफेअरबाबत कुटुंबातील काही लोकांना माहिती होती. परंतू राज हा दुसऱ्या जातीतील असल्याने कुटुंबाचा विरोध होता. आपल्याच समाजात सोनमने लग्न करावे, असे त्यांना वाटत होते, असाही दावा केला आहे.
सोनमच्या आईला राज आणि सोनमच्या प्रेमसंबंधांची माहिती होती. जर माझे दुसरीकडे लग्न लावून दिले तर त्याचा वाईट परिणाम होईल, अशी धमकी सोनमने तिला दिली होती. तसेच सोनमच्या अफेअरची माहिती देखील कुटुंबाला होती. परंतू राजाच्या कुटुंबापासून ती लपविण्यात आली, सोनमच्या आईने सर्व माहिती लपविल्याचा आरोप विपिनने केला आहे.
या प्रकरणात सोनमच्या आईचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी विपिनने केली आहे. सोनमच्या वडिलांना याची माहिती नव्हती, तसे असते तर त्यांनी राजला कधीच नोकरीवरून काढून टाकले असते, असेही विपिनने म्हटले आहे.
लग्नापूर्वी कट रचला, कुठे भेटायचे...
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सोनम आणि राजने लग्नापूर्वीच राजाला मारण्याचा कट रचला होता. यासाठी हे लोक इंदूरमधीलच स्कीम नंबर १५५ च्या एका मोकळ्या मैदानात भेटत होते. तिथेच राजाला कसे संपवायचे यावर चर्चा करत होते.
एकंदरीतच सोनम रघुवंशीबाबत समोर येत असलेली माहिती धक्कादायक आहे. राज हा इंदूरमध्ये राहून सगळे हाताळत होता, २० वर्षांचा असला तरी अट्टल गुन्हेगाराप्रमाणे राज आणि सोनम यांनी मिळून प्लॅन बनविला होता.