धक्कादायक! आधी कुऱ्हाडीनं वडिलांवर घाव घातला; नंतर डिजेवर जाऊन नाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 12:02 IST2020-02-17T12:02:03+5:302020-02-17T12:02:07+5:30

पोलिसांकडून मुलाला वरातीतून अटक; चौकशी सुरू

son went to marriage for dance after killing father with an ax | धक्कादायक! आधी कुऱ्हाडीनं वडिलांवर घाव घातला; नंतर डिजेवर जाऊन नाचला

धक्कादायक! आधी कुऱ्हाडीनं वडिलांवर घाव घातला; नंतर डिजेवर जाऊन नाचला

दादरी: प्रियकराच्या मदतीनं मुलीनं आईची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये घडला. ही घटना ताजी असतानाच ग्रेटर नोयडातल्या कलौंदा गावात एका ज्येष्ठ नागरिकाची कुऱ्हाडीनं घाव घालून हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या व्यक्तीच्या मुलाला अटक केली आहे. वरातीत डिजेवर नाचत असताना पोलिसांनी मुलाच्या मुसक्या आवळल्या. 

कलौंदा गावात राहणाऱ्या रामभूल यांची कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. दादरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा मुलगा ललितला अटक केली आहे. ललितला एक मोठा भाऊ आणि तीन बहिणी आहेत. या सगळ्यांचे विवाह झाले आहेत. ललित आणि त्याचा मोठा भाऊ अरुण या दोघांचा तीनच वर्षांपूर्वी विवाह झाला. दोघांच्या पत्नी सख्ख्या बहिणी आहेत. मात्र ललितची पत्नी गेल्या वर्षभरापासून माहेरी राहात आहे. कौटुंबिक वादामुळे रामभूल ललितच्या पत्नीला घरी येऊ देत नव्हते. 

पत्नीला घरी येण्याची परवानगी देत नसल्यानं रामभूल आणि ललित यांच्यात वारंवार वाद व्हायचे. शुक्रवारी रात्रीही दोघांचं भांडण झालं. या वादात अरुणनं मध्यस्थी केली. यानंतर अरुण दुसऱ्या मजल्यावर झोपायला गेला. तर रामभूल आणि ललित एकाच खोलीत झोपले. थोड्या वेळानं अरुण खाली आला. तेव्हा त्याला वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. याबद्दलची माहिती त्यानं पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी ललितला बछेडा गावातून अटक केली. ललित त्या गावातल्या वरातीत डीजेवर नाचत होता. 

Web Title: son went to marriage for dance after killing father with an ax

टॅग्स :Murderखून