शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

१८ आठवड्यांच्या गरोदर पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीची जन्मठेप कायम, कोलकाता हायकोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:53 IST

कोलकाता येथे गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीची शिक्षा कोर्टाने कायम ठेवली आहे.

Kolkata Crime: पतीने केवळ एकाचा नाही, तर दोघांचा बळी घेतला आहे. हे कृत्य अत्यंत क्रूर आणि अमानवीय आहे," अशा कठोर शब्दांत ताशेरे ओढत कोलकता उच्च न्यायालयाने एका नराधम पतीची जन्मठेप कायम ठेवली आहे. जानेवारी २०१४ मध्ये आपल्या १८ आठवड्यांच्या गरोदर पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले.

नेमकं प्रकरण काय?

२१ जानेवारी २०१४ रोजी हादरवून टाकणारी ही घटना घडली होती. हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या त्रासातून हे हत्याकांड घडले. आरोपी पतीने आपल्या पत्नीवर केवळ हल्लाच केला नाही, तर तब्बल २० ते ३० मिनिटे चाललेल्या या थरारात तिचा छळ करून जीव घेतला.

फावड्याने वार अन् दोरीने गळा आवळला

न्यायालयाने नमूद केले की, हा खून रागाच्या भरात झालेली कृती नव्हती. आरोपीने आधी पत्नीवर फावड्याने वार केले. त्यानंतर इतक्यावरच न थांबता, तिच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी बांधून तिला फरफटत नेले. या क्रूरतेमुळे तिचा मृत्यू झाला. ती १८ आठवड्यांची गरोदर होती, याची पूर्ण कल्पना पतीला होती, तरीही त्याने हे पाऊल उचलले.

१० वर्षांच्या मुलाची साक्ष ठरली निर्णायक

या संपूर्ण खटल्यात पतीला शिक्षा होण्यामागे त्यांच्या १० वर्षांच्या मुलाची साक्ष सर्वात महत्त्वाची ठरली. चिमुरड्याने खिडकीतून आपल्या वडिलांना आईवर हल्ला करताना पाहिले होते. वडिलांनी आईला मारल्यानंतर या मुलानेच तातडीने फोन करून आपल्या आजोबांना या घटनेची माहिती दिली. एखादा मुलगा आपल्या वडिलांविरुद्ध विनाकारण खोटी साक्ष देणार नाही, असे म्हणत न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि न्यायमूर्ती राय चटोपाध्याय यांच्या खंडपीठाने मुलाच्या साक्षीवर विश्वास दाखवला.

न्यायालयाने काय म्हटले?उच्च न्यायालयाने हावडा सत्र न्यायालयाचा २०१७ मधील निकाल कायम ठेवताना म्हटले की, "आरोपी हा कोल्ड ब्लडेड किलर आहे. त्याने आपल्या पत्नीला आणि पोटातील न जन्मलेल्या बाळालाही संपवले. हे कृत्य बेजबाबदार आणि अमानवीय आहे." बचाव पक्षाने असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला की मुलाला शिकवून साक्ष द्यायला लावली आहे, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. घटनेच्या वेळी घरात पुरेसा प्रकाश होता आणि मुलाने दिलेली घटनाक्रमाची माहिती पूर्णपणे विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

शिक्षेवर शिक्कामोर्तब

आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा आणि ३,००० रुपये दंड सुनावण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला १० वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Husband's life sentence upheld for murdering pregnant wife in Kolkata.

Web Summary : Kolkata High Court upheld a man's life sentence for the brutal murder of his 18-week pregnant wife. The husband fatally attacked her with a shovel and rope due to dowry harassment. His 10-year-old son's testimony was crucial in securing the conviction.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगाल