किरकोळ वादातून मुलाने आईवर चाकू वार करून केले जखमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 10:56 IST2020-09-19T10:56:14+5:302020-09-19T10:56:49+5:30

नीलेश गवई याने खिशातून चाकू काढून आईच्या पोटावर वार केला.

Son stabs his mother in Akot | किरकोळ वादातून मुलाने आईवर चाकू वार करून केले जखमी!

किरकोळ वादातून मुलाने आईवर चाकू वार करून केले जखमी!


अकोट : किरकोळ वादातून मुलाने आईच्या पोटावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी ११ वाजता घडली. याप्रकरणी अकोट शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बर्डे प्लॉटमध्ये राहणाऱ्या नितीन सारंगधर गवई (३२) याच्या तक्रारीनुसार आरोपी नीलेश सारंगधर गवई (३0) हा नेहमीच विनाकारण लोकांना शिवीगाळ करतो. याबाबत नितीन गवई याने जाब विचारला असता, त्याने त्याला मारहाण केली. दोघा भावांच्या भांडणात आई मध्यस्ती करण्यासाठी गेली असता, आरोपी नीलेश गवई याने खिशातून चाकू काढून आईच्या पोटावर वार केला. तसेच भावाच्याही मानेवर व पायावर चाकूने वार करून जखमी केले. या प्रकरणात अकोट शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३0७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास अकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले करीत आहेत.

 

 

Web Title: Son stabs his mother in Akot