शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या चारित्र्यावर बाप घेत होता संशय; अखेर छातीत चॉपर खुपसून मुलाने केली त्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 15:10 IST

Murder Case : जळगावातील घटना : दवाखान्यात जाण्यावरुन पडली वादाची ठिणगी

ठळक मुद्देयाप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : सतत आईच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, मुळ रा.घनश्यामपूर, ता.खकनार, जि.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा मुलाने छातीत चॉपर खोपसून खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ घडली. गोपाल व दीपक या दोन्ही मुलांना पोलिसांनीअटक केली आहे. प्रेमसिंग याला दवाखान्यात नेण्याच्या कारणावरुन वादाची ठिणगी पडली अन‌् खुनाची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घटनास्थळावरुन नातेवाईक व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग राठोड याला कानाचा त्रास होता. रविवारी त्याला शहरातील दवाखान्यात नेऊन नंतर बऱ्हाणपूर येथे घेऊन जाण्याबाबत मुलगा गोपाल व दीपक या दोघांनी आग्रह केला. यावेळी प्रेमसिंग याने त्यास विरोध करुन तिकडे गेल्यावर मागे पत्नी दुसऱ्या लोकांच्या संपर्कात राहते असे बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यामुळे मुले व बाप यांच्यात वाद झाला. दीपक याने दांडक्याने बापाला मारले तर प्रेमसिंग याने घरात लपवून ठेवलेला चॉपर आणून दोन्ही मुलांवर हल्ला करणार तितक्यात गोपाल याने हा चॉपर हिसकावून प्रेमसिंग याच्या छातीवर, डोक्यावर कमरेजवळ वार केले. त्यात प्रेमसिंग जागीच गतप्राण झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगावArrestअटकDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश