शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:27 IST

जेव्हा छोटा मुलगा घरी परतला त्याने आईबाबत विचारणा केली. मात्र मोठ्या भावाने काहीच उत्तर दिले नाही.

कानपूरच्या रावतपूर येथे १२ वीत शिकणाऱ्या मुलाने गाणी ऐकण्यापासून रोखल्यामुळे त्याच्या आईचीच हत्या केली आहे. त्यानंतर आईचा मृतदेह बेडीमध्ये टाकला. लहान मुलगा बाहेरून घरी परतला तेव्हा हा प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मोठ्या मुलाने ओढणीने आईचा गळा दाबून तिची हत्या केली आणि त्यानतर मृतदेह बेडखालील स्टोरेजमध्ये ठेवला. मृत महिलेचा छोटा मुलगा शाळेतून परतला आणि त्याने आईचा शोध घेतला. मोठ्या भावाला आईबाबत विचारणा केली त्यानेही काही उत्तर दिले नाही. खूप शोधल्यानंतरही आई त्याला सापडली नाही. त्याचवेळी बेडचा एक भाग थोडा वर आल्याचे पाहिले त्यानंतर बेड उघडला तेव्हा आईचा मृतदेह पाहून त्याला धक्का बसला. 

आईचा मृतदेह पाहताच छोटा मुलगा किंचाळला. त्यानंतर आसपासचे लोकही जमा झाले. महिलेचा श्वास सुरू होता त्यामुळे गोंधळात महिलेला हॉस्पिटलला पाठवले. स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. महिलेला हॉस्पिटलला नेले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आतापर्यंत केलेल्या तपासात रागाच्या भरात मोठ्या मुलाने आईचा खून केल्याचे समोर आले. माहितीनुसार, रावतपूर येथे ऊर्मिला राजपूत या एका व्यक्तीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होत्या. त्यांच्यासोबत २ मुलेही होती. ऊर्मिला यांच्या पहिल्या पतीचा मुलगा जो १२ वीचे शिक्षण घेत आहे तर दुसरा मुलगा १० वीत शिकतो. आईने दोन्ही मुलांना घरातील कामांचे वाटप केले होते. मंगळवारी छोटा मुलगा शाळेत गेला होता. त्यावेळी मोठ्या मुलाला आईने भांडी घासायला सांगत स्वत: बीपीची गोळी घेऊन झोपायला गेली. 

त्याचवेळी मुलगा मोठ्या आवाजात गाणी ऐकत होता. ऊर्मिला यांची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांनी मुलाला गाणी बंद करण्यास सांगितले. मुलाने ऐकले नाही म्हणून चिडलेल्या आईने गाण्याचा स्पीकर मोडून टाकला. या प्रकाराचा मुलालाही राग आला. त्याने आईला जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे आई जमिनीवर खाली पडली आणि तिच्या नाकाला दुखापत झाली. त्यात घाबरलेल्या मुलाने आई हा प्रकार सर्वांना सांगेत यामुळे त्याने ओढणीने आईचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आईचा मृतदेह लपवण्यासाठी त्याने बेडचा वापर केला असं पोलीस अधीक्षक रंजीत कुमार यांनी सांगितले. 

दरम्यान, जेव्हा छोटा मुलगा घरी परतला त्याने आईबाबत विचारणा केली. मात्र मोठ्या भावाने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर त्याला बेडमध्ये लपवलेला आईचा मृतदेह दिसला तेव्हा आईचा श्वास सुरू होता. त्याने स्थानिकांच्या मदतीने आईला हॉस्पिटलला नेले. या घटनेची माहिती पोलिसांनाही कळवली. हॉस्पिटलमध्ये पोहचताच डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. रागाच्या भरात आईचा खून केल्याचे मोठ्या मुलाने पोलिसांसमोर कबूल केले. मात्र ऊर्मिलाचे वजन ९० किलो होते, एका १२ वीच्या विद्यार्थ्याला इतक्या वजनाचे शरीर एकट्याने बेडमध्ये टाकणे शक्य आहे का, या हत्येत ऊर्मिलासोबत लिव्ह इनमध्ये राहणाराही सहभागी आहे का याबाबत पोलीस तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी