नात्याला काळीमा! पोटच्या मुलानेच काढला वडिलांचा काटा, आईसह मिळून केले तुकडे अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:38 IST2022-11-21T13:27:32+5:302022-11-21T13:38:06+5:30

पत्नीने आपल्या मुलासोबत मिळून आपल्याच पतीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे सहा तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.

son killed father in baruipur west bengal crime same like shraddha walker murder case | नात्याला काळीमा! पोटच्या मुलानेच काढला वडिलांचा काटा, आईसह मिळून केले तुकडे अन्...

नात्याला काळीमा! पोटच्या मुलानेच काढला वडिलांचा काटा, आईसह मिळून केले तुकडे अन्...

श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणेच (Shraddha Murder Case) आणखी एक हत्याकांड समोर आलं आहे. पश्चिम बंगाल येथील बरुईपूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीने आपल्या मुलासोबत मिळून आपल्याच पतीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे सहा तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पण अखेर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून मृतदेहाचे तुकडे शोधण्याचं काम सध्या सुरू असल्याचं म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी ही भयंकर घटना घडली होती. उज्ज्वल चक्रवर्ती असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते बेपत्ता असल्याची तक्रार आधी करण्यात आली होती. पण नंतर पत्नी आणि लेकाने मिळून त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. तपासामध्ये त्यांना दारूचं व्यसन होतं आणि नेहमीच ते नशेत गोंधळ घालत असल्याचं म्हटलं आहे. 14 नोव्हेंबर रोजी कुटुंबाचं भांडण झालं होतं. पण नातेवाईकांनी त्या गोष्टीचा उल्लेख आपल्या तक्रारीत केला नव्हता. 

पोलिसांनी कसून चौकशी केली असता लेकाने आपणच हत्या केल्याचं कबूल केलं आहे. तसेच सर्व धक्कादायक प्रकार सांगितला आहे. उज्ज्वल हे आपल्या पत्नीला आणि मुलाला वारंवार मारहाण करत होता. त्यांच्यात सारखी भांडणं होत होती. पोलीस अधिकारी पुष्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यक्तीच्या मृतदेहाचे काही तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशवीत भरण्यात आले आणि नंतर तलावात फेकले. मुलाने चौकशीमध्ये याबाबत माहिती दिली. 

गळा दाबून मुलाने वडिलांची हत्या केली. त्यानंतर पुढचे तीन चार तास त्यांना मृतदेहाचं नेमकं काय करायचं हे समजलंच नाही. त्यांनी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाप्रमाणे मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. आईने बाथरूममध्ये मृतदेह कापण्याची कल्पना सांगितली. त्यामुळेच पोलिसांना रक्ताचे डाग दिसले नाहीत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: son killed father in baruipur west bengal crime same like shraddha walker murder case