जावई जिवावर उठला! पत्नी, मेव्हणीसह सासऱ्यांवर चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 08:17 IST2022-10-12T08:17:48+5:302022-10-12T08:17:58+5:30

रणपिसे चाळीमध्ये राहणाऱ्या वैशाली सूर्यवंशी हिने याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Son-in-law attack on Wife, sister-in-law and father-in-law stabbed | जावई जिवावर उठला! पत्नी, मेव्हणीसह सासऱ्यांवर चाकूने वार

जावई जिवावर उठला! पत्नी, मेव्हणीसह सासऱ्यांवर चाकूने वार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :  क्षुल्लक कारणावरून राहुल लोखंडे या तरुणाने पत्नी, मेव्हणीसह सासऱ्यांवर चाकूने वार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली.

रणपिसे चाळीमध्ये राहणाऱ्या वैशाली सूर्यवंशी हिने याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिची बहीण सारिका आणि वैशालीचा पती राहुल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडणे सुरू आहेत. नेहमीप्रमाणे ९ ऑक्टोबरला सारिका नोकरीला जाण्यासाठी निघाली होती. त्याच वेळी राहुल याने क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात घरातील चाकूने   सारिकाच्या ओटीपोटावर तसेच गळ्यावर वार केले. तिच्या आवाजाने सारिकाचे वडील आणि बहीण वैशाली त्या ठिकाणी मध्यस्थीसाठी धावत गेले. तेव्हा त्याच चाकूने त्याने मेव्हणीच्याही डोक्यावर आणि सासरे दिनेश यांच्या पोटावर 
वार केले.

Web Title: Son-in-law attack on Wife, sister-in-law and father-in-law stabbed