मुलगा दवाखान्यात भरती, चोरट्यांनी वृद्धेचे घर फोडले! 

By योगेश पांडे | Updated: September 10, 2023 12:34 IST2023-09-10T12:33:58+5:302023-09-10T12:34:22+5:30

लक्ष्मी रमेश बागडे (७०,मिलींद बौद्ध विहाराजवळ, रामबाग) यांचा मुलगा दवाखान्यात भरती होता.

Son admitted to the hospital, thieves broke the old man's house in Nagpur | मुलगा दवाखान्यात भरती, चोरट्यांनी वृद्धेचे घर फोडले! 

मुलगा दवाखान्यात भरती, चोरट्यांनी वृद्धेचे घर फोडले! 

नागपूर : मुलगा उपचारांसाठी दवाखान्यात भरती असताना चोरट्यांनी एका वृद्धेचे घर फोडत अडीच लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल लंपास केला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

लक्ष्मी रमेश बागडे (७०,मिलींद बौद्ध विहाराजवळ, रामबाग) यांचा मुलगा दवाखान्यात भरती होता. ८ सप्टेंबर रोजी त्या रात्री घराच्या मुख्य दाराला कुलूप लावुन इस्पितळात गेल्या. यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडुन त्यामधील सोन्याचे दागिने व नगदी ६० हजार रुपये असा एकूण २.७० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. 

घरी आल्यावर लक्ष्मी यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Son admitted to the hospital, thieves broke the old man's house in Nagpur