शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 01:40 IST

बनावट कागदपत्रे तयार करून एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री प्रकरण

ठळक मुद्देकाळे यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना न्यायालयाने शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. देशपांडे यांनी हा आदेश दिला. काळे यांनी अ‍ॅड. प्रशांत जाधव यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. रविवारी दुपारी एक ते चार यावेळेत सांगवी पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहायचे. तपासात सहकार्य करण्याचे या अटींवर व 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर काळे यांची सुटका करण्यात आली. काळे यांनी 2002 मध्ये पिंपळे-निलख येथील औंदूंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी सिंधू सुभाष चव्हाण (रा. कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काळे यांच्या विरोधात 4 मे 2019 ला सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार सांगवी ठाण्यातील उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांचे पथक 29 मेला सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले. काळे यांना ताब्यात घेऊन हे पथक त्याच दिवशी रात्री शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यांना शिंका येऊ लागल्याने उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र ताप आणि शिंका असल्याने पोलिसांनी काळे यांना रूग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. पण त्यांना सोडून देण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सांगवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक