शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडिया, सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचे जाळे... दिल्ली पोलिसांनी सेक्सटोर्शन टोळीचा केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:39 IST

Sextortion Case : सेक्सटोर्शनच्या नावावर तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. तक्रारदाराने दीड लाख रुपये रोख आणि उर्वरित दीड लाख बँक खात्यातून ट्रान्सफरही केले होते.

दिल्लीच्या पश्चिम विहारमध्ये सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये सेक्सटोर्शनच्या नावावर तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. तक्रारदाराने दीड लाख रुपये रोख आणि उर्वरित दीड लाख बँक खात्यातून ट्रान्सफरही केले होते.

दिल्लीपोलिसांना ही तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस उपनिरीक्षक सीताराम, उपनिरीक्षक मनीष आणि एसीपी अरविंद कुमार यांच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे रॅकेट सुरू होतेआरोपी पश्चिम विहार परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहून असे सेक्सटोर्शन रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. टेक्निकल सर्व्हिलन्स आणि मिळालेल्या माहितीच्या मदतीने ही टोळी नीरज हा बहादूरगड येथील एक व्यक्ती चालवत असल्याची माहिती मिळाली. या टोळीने पश्चिम विहारमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला होता.पोलिसांनी नीरजच्या अटकेसाठी सापळा रचून प्रशांत विहार येथून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान, नीरजने त्याची टोळी भोळ्या लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवते आणि त्यांना फ्लॅटवर बोलावल्यानंतर व्हिडिओ बनवला जातो. हा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचं कबुल केलं आहे. लोकांना अडकवण्याचा हनीट्रॅपचा खेळहनीट्रॅपद्वारे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या या टोळीत एका मुलीचाही समावेश आहे. त्याच्या टोळीत ५ सदस्य असल्याचा खुलासा नीरजने केला. आतापर्यंत त्याने डझनहून अधिक लोकांना आपला जाळ्यात अडकवले आहे. प्रत्येक पीडितेकडून पाच ते दहा लाख रुपये उकळले. लॉकडाऊनची पहिली लाट म्हणजेच कोरोना सुरू होताच ही टोळी सुरू झाली.आरोपी मुलीचे प्रोफाईल फेसबुकच्या माध्यमातून मिळवायचा आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिला बळीचा बकरा बनवला जात असे. अनेकवेळा तरुणी आणि पीडित व्यक्ती खोलीत असताना या टोळीचे लोक पोलीस बनून आत शिरायचे आणि मग ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होत असे. या टोळीशी संबंधित उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसdelhiदिल्लीSocial Mediaसोशल मीडियाArrestअटक