शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Cyber Crime News: रात्री अनोळखी नंबरवरून आलेला व्हिडीओ कॉल त्याने उचलला, तरुणीचा अश्लील फोटो स्क्रीनवर दिसला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 19:35 IST

Cyber Crime News: अनोळखी क्रमांकावरून अंकितच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉल आला. अंकितने हा व्हिडीओ कॉल अटेंड केला, तर दुसरीकडून मुलीचा अश्लिल फोटो मोबाईलच्या स्क्रीनवर दिसला.

ठळक मुद्देदुसर्‍या दिवशी अंकितच्या मोबाइल नंबरवर एक मेसेज आला. हा मेसेज पाहताच अंकितच्या पायाखालची जमीन सरकली.

लखनऊ : सध्या सोशल मीडिया अज्ञात लोकांसोबत आधी मैत्री आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग करण्याचे सर्वात शस्त्र बनत आहे. लोकांना अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल येत आहेत. जर कोणी फसव्या पद्धतीने व्हिडीओ कॉल केला तर समजून घ्या की, ती व्यक्ती ब्लॅकमेलिंगचा बळी पडत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या बर्‍याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, एखाद्या अनोळखी मुलासोबत किंवा मुलीसोबत करण्यात आलेली मैत्री ही हनी ट्रॅप होऊ शकते. (New Trick Of Cyber Blackmailing: Nude Girl Comes On Screen After Receiving Video Call, Then Threat To Extract Money)

एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा 28 वर्षांचा इंजीनिअर अंकित अशाच हनीट्रॅपमध्ये अडकला. खरंतर, गेल्या आठवड्यात अचानक रात्री अकरा वाजता, एका अनोळखी क्रमांकावरून अंकितच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉल आला. अंकितने हा व्हिडीओ कॉल अटेंड केला, तर दुसरीकडून मुलीचा अश्लिल फोटो मोबाईलच्या स्क्रीनवर दिसला. अचानक एका अनोळखी क्रमांकावरून आलेल्या या व्हिडीओ कॉलवर मुलगी स्वत:चे कपडे काढताना पाहिल्यानंतर अंकितला काहीच समजले नाही. त्याने लगेच तो व्हिडीओ कॉल बंद केला. 

दुसर्‍या दिवशी अंकितच्या मोबाइल नंबरवर एक मेसेज आला. हा मेसेज पाहताच अंकितच्या पायाखालची जमीन सरकली. या मेसेजमध्ये त्याच्याकडे गुगल पेवर पैशांची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. हे सर्व अचानक कसे घडले, हे अंकितला समजू शकले नाही. तरीही यासंदर्भात कायद्याची मदत कशी घेता येऊ शकतो,  असाही प्रश्न त्याला पडला. कारण एकीकडे अश्लील फोटो व्हिडीओ व्हायरल होण्याची भीती होती तर दुसरीकडे सोशल साइटवर अश्लीलतेमुळे समाजातील आदर कमी होण्याची भीती होती.

दरम्यान, हे प्रकरण फक्त अंकितचेच नाही. तर उत्तर प्रदेश पोलिसांच्या सायबर युनिटला अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यातही वाढ झाली आहे. "हे सर्व डीप फेक (deep fake) टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे होत आहे. अशी सर्व टोळी राजस्थानमधील भरतपूर, यूपीमधील मथुरा आणि हरियाणाच्या मेवात भागात अधिक सक्रिय आहे, जेथे मुले व मुली असेच ब्लॅकमेलिंगचे काम करत आहेत. कधीकधी अशा तक्रारी देखील आल्या आहेत की, व्हिडीओ कॉल अटेंड करण्याऱ्यांना काही केले नाही, परंतु जलसाजोने सिंथेटिक व्हिडिओ किंवा इमेजमुळे त्यांचाही अश्लील व्हिडीओ आणि फोटो बनविला", असे एसएसपी (सायबर क्राइम) त्रिवेणी सिंह यांनी सांगितले.

याचबरोबर, त्रिवेणी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत पोलीस तक्रारीवर बदनामी आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती पीडित व्यक्तीला असते. यामुळेच लोक पोलिसांकडे मदतीसाठी विचारण्यास येतात, परंतु एफआयआर नोंदविण्यास टाळाटाळ करतात. दरम्यान, असे सायबर गुन्हेगार काहीही व्हायरल करत नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे, कारण जर त्यांनी व्हायरल केले तर त्यांना अटक होण्याची भीती जास्त असते. ते फक्त धमकी देतात. 

व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होण्याच्या धमकीवर लोक लाखो रुपये देत आहेत. अशा परिस्थितीत अज्ञात क्रमांकावरून कोणताही व्हिडिओ कॉल उचलला जाऊ नये आणि संशयास्पद लोकांना अनैतिक संबंध ठेवण्यासाठी सोशल मीडियावर आपली मित्र यादी तपासणे सर्वात प्रभावी आहे. दिल्ली आणि हरियाणा पोलिसही यूपी पोलिसांसमवेत अशा गुन्हेगारांवर कारवाई करत आहेत, असेही त्रिवेणी सिंह म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम