…म्हणून महिलेने उकळत्या तेलात बुडवला ११ वर्षीय मुलीचा हात, धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 23:51 IST2021-09-23T23:51:29+5:302021-09-23T23:51:48+5:30
Crime News: गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एका महिलेने ११ वर्षींय मुलीला क्रूर शिक्षा दिल्याचे समोर आले आहे. या महिलेने शेजारच्या ११ वर्षीय मुलीचा हात उकळत्या तेलात बुडवला.

…म्हणून महिलेने उकळत्या तेलात बुडवला ११ वर्षीय मुलीचा हात, धक्कादायक कारण आलं समोर
अहमदाबाद - गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एका महिलेने ११ वर्षींय मुलीला क्रूर शिक्षा दिल्याचे समोर आले आहे. या महिलेने शेजारच्या ११ वर्षीय मुलीचा हात उकळत्या तेलात बुडवला. ही मुलगी खोटं बोलतेय की नाही याची खातरजमा करण्यासाटी या महिलेने या मुलीचा हात उकळत्या तेलात टाकला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी आरोपी लखी मकवाना हिला अटक केली आहे. ही घटना बुधवारी पाटणमधील संतालपूर शहरात घडली. (the woman dipped the hand of an 11-year-old girl in boiling oil)
गुजरात राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा जागृतीबेन पंड्या यांनी डीएमकडे या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. घटनेनंतर तयार करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये पीडितेचा उजवा हात जळाल्याचे आणि ती रडत रडत घडलेली घटना सांगत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
जागृतीबेन पंड्या यांनी माध्यमांना सांगितले की, पाटन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे मला सांगण्यात आले आहे. मी आपल्या जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याला सूचना केली आहे की, पीडितेच्या घरी जावा आणि तिच्यावरील उपचारांचा आढावा घ्या. मी जिल्हाधिकाऱ्यांनाही आपल्या परीने तपास करण्याचे आणि रिपोर्ट देण्याची सूचना दिली आहे.
संतालपूर ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर एनडी परमार यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हल्ला आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, तपासामधून समजले की, महिला आणि पीडित मुलीचे कुटुंब हे शेजारी आहेत. तसेच दहा दिवसांपूर्वी मुलीने घराबाहेर या महिलेला एका अज्ञात व्यक्तीसोबत बोलताना पाहिले होते.