... So sister in law husband killed the girl and ended his own life! | ...म्हणून नणंदेच्या नवऱ्याने तरुणीची हत्या करून स्वतःचेही संपविले आयुष्य!

...म्हणून नणंदेच्या नवऱ्याने तरुणीची हत्या करून स्वतःचेही संपविले आयुष्य!

मुंबई : एकतर्फी प्रेमातून नणंदेच्या नवऱ्यानेच तरुणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूर, वाशीनाका म्हाडा वसाहतीत २५ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसोबत राहत होती. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नणंदेचा नवरा मोहम्मद शेख आला. तरुणी त्याच्याविरुद्ध पाेलिसांत तक्रार करणार असल्याचे त्याला समजले होते. तिच्याशी बाेलायचे आहे असे सांगून मोहम्मदने नातेवाईकांना जबरदस्तीने घराबाहेर काढले. त्यानंतर आतून कडी लावून तरुणीला बेदम मारहाण केली. काचेच्या खिडकीवर तिचे डोके आपटले. फुटलेल्या काचेने तिच्या गळ्यावर वार केले. तरुणीच्या  किंकाळीने तिला सोडण्यासाठी कुटुंब विनवणी करत होते. मात्र मोहम्मद तिच्यावर क्रूरपणे वार करत हाेता.
ती मेल्याची खात्री पटताच त्याच काचेने त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. नातेवाईक दरवाजा तोडून आत येण्याआधीच दोघांचा मृत्यू झाला होता. 
आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून मोहम्मदने तरुणीची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस नातेवाईकांकडे अधिक तपास करत आहेत.

Web Title: ... So sister in law husband killed the girl and ended his own life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.