शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

कडीपत्त्याच्या नावाखाली अ‍ॅमेझॉनवरून होत होती गांजाची तस्करी, असा झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 15:46 IST

Online Marijuana Smuggling: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या Amazon वरून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्कती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी यामधील एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करताना सुमारे २० किलो गांजासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

भोपाळ - ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या अ‍ॅमेझॉनवरून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्कती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी यामधील एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करताना सुमारे २० किलो गांजासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गांजाची तस्करी ही कडीपत्त्याचे नाव देऊन होत होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गांजाचा हा साठा विशाखापट्टणममधून ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून मध्य प्रदेशमध्ये मागवण्यात आला होता. आरोपींच्या प्राथमिक चौकशीमध्ये अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल एक टन मारिजुआनाची तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक माहिची त्यांनी दिली.

गांजासोबत पोलिसांनी ज्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामधील एकाची ओळख सूरज उर्फ कल्लू आणि पिंटू उर्फ बिजेंद्र सिंह तोमर अशी पटली आहे. हा २० किलो गांजा विशाखापट्टणम येथून अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता.

पोलिसांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या लोकांकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार महिन्यामध्ये या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून निर्बंध घातलेला हा मादक पदार्थ मागवण्यात येत होता. या माध्यमातून सुमारे एक टन गांजा आधीच मागवण्यात आला होता. या माध्यमातून आरोपींनी गेल्या चार महिन्यांमध्ये एक कोटी १० लाख रुपयांच्या गांजाची तस्करी केली आहे.

दरम्यान, दोन आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्या एका सहकाऱ्याला हरिद्वार येथून पकडण्यात आले आहे. आंध्र प्रदेशमधून आरोपी सूरज ऊर्फ कल्लू पवय्या हा अ‍ॅमेझॉनवरून कडीपत्त्याचा टॅग लावून गांजाची डिलिव्हरी ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि इतर जिल्ह्यांमध्ये होत असे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीamazonअ‍ॅमेझॉनDrugsअमली पदार्थ