शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

एपीएमसी परिसरात झोपडपट्टी दादाची दहशत; अटक टाळण्यासाठी झोपडी जाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 12:22 AM

तरुणावर खुनी हल्ला : पोलीस पथकालाही केला विरोध

नामदेव मोरेनवी मुंबई : एपीएमसी परिसरामध्ये इम्रान खान या झोपडपट्टी दादाने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. २९ नोव्हेंबरला एका तरुणावर खुनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकालाही विरोध करून परत पाठविले. अटक टाळण्यासाठी झोपडीला आग लावली. नागरिकांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळे झोपडीमधील दोन मुलांचा जीव वाचविता आला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटच्या समोरील बाजू रेल्वे यार्ड यांच्यामध्ये असलेल्या भूखंडांवर अनधिकृतपणे झोपड्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. या परिसरात इम्रान खान याची प्रचंड दहशत आहे. झोपड्या बांधून त्यांची विक्री करणे, वीजपुरवठा चोरून झोपड्यांना पुरविणे व तेथील रहिवाशांनी वीजबिलांच्या नावाखाली पैसे वसूल करणे व इतर अनेक गैरव्यवहार सुरू आहेत. रविवारी वाशी गाव येथे राहणारा तरुण उदय पटेल हा मयूर वाॅटर सप्लाय कंपनीचा ट्रक दुरुस्त करण्यासाठी सलीम ऑटो गॅरेजमध्ये गेला होता. त्यावेळी इम्रान, त्याचा साथीदार समीर खान व सलीम खानसह इतरांनी पटेल याला बेदम मारहाण केली. लोखंडी रॉडने डोक्यावर, पाठीवर व इतर ठिकाणी वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही घटना समजल्यानंतर पोलीस कारवाईसाठी घटनास्थळी गेल्यानंतर, इम्रानने बेकायदेशीरपणे जमाव जमवून पोलिसांच्या कामामध्येही अडथळे निर्माण केले. पोलीस पथकाला कारवाई करू दिली नाही.

पाेलिसांनी अटक करू नये, यासाठी रॉकेलची कॅन घेऊन जाळून घेण्याची धमकी दिली. शेजारील झोपडीवर रॉकेल टाकून पेटवून दिली. झोपडीमध्ये दोन मुले झोपली होती. त्यांची आई कडी लावून कामानिमित्त बाहेर गेली होती. झोपडी जळू लागल्यानंतर महिला घटनास्थळी आल्यानंतर मुले आतमध्येच असल्याचे लक्षात आले. प्रसंगावधान राखून त्या मुलांना बाहेर काढले व आग विझविली म्हणून मोठी दुर्घटना टळली. आग विझविली नसती, तर परिसरातील इतर झोपड्याही जळून खाक झाल्या असत्या. या गोंधळाचा गैरफायदा घेऊन आरोपी घटनास्थळावरू पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे हे स्वत: या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गुन्ह्यांची मालिकाबाजारसमितीजवळील ग्रीन पार्क झोपडपट्टी परिसरात इम्रान याची अनेक वर्षांपासून दहशत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, मारामारी, शस्त्राचा वापर व इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कडक कारवाई करावी व या परिसरातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. दहशतीमुळे त्याच्या विरोधात कोणीही आवाज उठवत नाही.

भूखंडावर अतिक्रमणया परिसरातील सिडकोच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. इम्रान व त्याचे सहकारी झोपड्या बांधून त्यांची २० ते ५० हजार रुपयांमध्ये विक्री करत आहेत. या झोपड्यांना बेकायदेशीरपणे पाणी व वीजपुरवठाही केला जात आहे. वीजबिलाच्या नावाखाली प्रत्येक महिन्याला हजारो रुपये वसूल केले जात आहेत. येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे.

महावितरणचेही दुर्लक्षसर्वसामान्य नागरिकांनी दोन महिन्यांचे वीजबिल थकविले, तरी महािवतरणचे कर्मचारी वीजपुरवठा खंडित करतात, परंतु ग्रीन पार्क झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात वीजचोरी सुरू असूनही संबंधितांवर गुन्हे दाखल केेले जात नाहीत. महावितरण, महानगरपालिका, पोलीस, सिडको अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत असल्यामुळे झोपडपट्टी दादांची दहशत वाढली असल्याचे मतही नागरिक व्यक्त करत आहेत.  

 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीPoliceपोलिसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका