शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहासोबत रात्रभर झोपला दिव्यांग, धक्कादायक घटना काय ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 21:11 IST

Crime News : आरोपी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करू शकले नाहीत आणि तुरुंगात पोहोचले.

दिल्लीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी रात्रभर मृतदेहाजवळ झोपले. दिल्ली पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. खरे तर खुनी हा अपंग असून पोलिसांना त्याच्यावर खुनाचा संशय येऊ नये या उद्देशाने तो मृतदेहाजवळ झोपला होता. मात्र आरोपी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करू शकले नाहीत आणि तुरुंगात पोहोचले.दिल्ली पोलिसांना १ जानेवारी रोजी सुभाष नगर परिसरातील सूर्या हॉटेलजवळ एक पुरुषाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती, पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी पाहिले की, रस्त्याच्या कडेला झोपडपट्टी होती आणि जवळ एक मृतदेह पडलेला होता. मृतदेह पाहिल्यानंतर मृतदेहावर चाकूने अनेक वार केल्याचे दिसून आले.दिव्यांगास हत्येप्रकरणी अटकपोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला, तपासात मृताचे नाव चंदन असून तो सुभाष नगर परिसरात राहतो, असे पोलिसांच्या पथकाला समजले, चंदन त्याच्या दोन मित्रांसह राजौरी गार्डनमधील अन्सल प्लाझा मॉलमध्ये नवीन वर्ष साजरे करत होता. आरोपींची चौकशी केली असता मित्रांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सूर्या हॉटेलबाहेर  हा मृत चंदन सिगारेट घेण्यासाठी दुकानात गेला होता.

या मुद्द्यावरून पोलिस पथकाने तपास पुढे नेला. त्या रात्री मृत चंदनची भेट रस्त्याने भीक मागून जाणार्‍या एका ६५ वर्षीय वृद्ध दिव्यांगाशी झाली होती, असे स्थानिक माहितीगारांकडून समजले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंदन आणि संतोष दोघेही दारूच्या नशेत होते, त्यामुळे दोघांचेही दारूच्या नशेत एखाद्या गोष्टीवरून वाद आणि वादाचे रुपांतर मारामारीत झाले.नशेत मृत आणि दिव्यांग यांच्यात वाद झालादरम्यान, विनोद नावाचा २० वर्षीय तरुणही स्कूटीने घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी सांगितले की, विनोद हा दिव्यांग संतोषची देखभाल करतो. विनोदला पाहताच संतोष लगेच त्याच्याकडे पोहोचला. मात्र त्यादरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चंदनने संतोषला शिवीगाळ करणे सुरूच ठेवले आणि त्याने दिव्यांग संतोषलाही मारहाण केली. त्यानंतर विनोद आणि संतोष यांची चंदनसोबत हाणामारी झाली आणि त्यानंतर आरोपी विनोद आणि संतोष यांनी चंदनवर चाकूने हल्ला केला.पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलीचाकू लागल्याने चंदनचा जागीच मृत्यू झाला आणि आरोपी विनोद ताबडतोब स्कूटी घेऊन त्याच्या घरी गेला, मात्र दिव्यांग रात्रभर मृतदेहासोबत पडून होता, कारण त्याला दोन कारणांमुळे पोलिसांना संशय येणार नाही असे वाटले, एक तर तो शारीरिक दुर्बल आहे आणि दुसरा घटनास्थळावरून पळून जाऊ शकत नाही. मात्र संतोषची ही युक्ती पोलिसांसमोर चालली नाही आणि खुनाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी संतोष आणि विनोदला अटक केली असून खुनात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू