सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 17:51 IST2019-11-01T17:50:22+5:302019-11-01T17:51:16+5:30
धारणी तालुक्यातील जांबू या गावातून सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले. बुधवारी ही घटना उघड झाली.

सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण
अमरावती - धारणी तालुक्यातील जांबू या गावातून सहा वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले. बुधवारी ही घटना उघड झाली. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या त्या चिमुकल्याचे मध्यरात्रीच्या सुमारास अपहरण झाल्याने खळबळ उडाली. याबाबत धारणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
धारणीपासून ४० किलोमीटर अंतरावरील जांबू या गावात आपल्या आई-वडिलांकडे राहणाºया महिलेस सुनील नावाचा सहा वर्षे वयाचा मुलगा आहे. सदर महिलेचा पती सहा वर्षांपूर्वी मुंबई येथे कामानिमित्त गेला होता. तो अद्यापही परतलेला नाही. त्यामुळे ती चार वर्षांपासून आई-वडिलांकडे जांबू या गावी चिमुकल्यासोबत वास्तव्यास आहे. बुधवारी रात्री ही महिला चिमुकल्यासह झोपली असता, रात्री तीनच्या दरम्यान तिच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. गावातीलच कालू करणसिंग कासदेकर (२५) याने आपल्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार त्या महिलेने धारणी पोलीस ठाण्यात केली आहे.