आंध्र प्रदेशमध्ये पोलिसांशी चकमकीत सहा माओवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:08 AM2021-06-17T06:08:23+5:302021-06-17T06:08:43+5:30

मोठा शस्त्रसाठा जप्त; शोधमोहीम सुरू राहणार. तिगालमेट्टाच्या जंगलात आंध्र प्रदेश पोलिसांनी माओवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी ही चकमक उडाली.

Six Maoists killed in clashes with police in Andhra Pradesh | आंध्र प्रदेशमध्ये पोलिसांशी चकमकीत सहा माओवादी ठार

आंध्र प्रदेशमध्ये पोलिसांशी चकमकीत सहा माओवादी ठार

googlenewsNext

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील कोय्युरू या भागातील तिगालमेट्टाच्या जंगलात बुधवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओअिस्ट) या संघटनेचे ते सदस्य होते. 

तिगालमेट्टाच्या जंगलात आंध्र प्रदेश पोलिसांनी माओवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी ही चकमक उडाली. ठार झालेल्या सहा माओवाद्यांकडून पोलिसांनी एके-४७ रायफल, एक कार्बाइन, ३०३ रायफली, एक स्वदेशी बंदूक, यासह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ही चकमक  घनदाट जंगलातील खूप दुर्गम भागात झाली आहे. त्यात माओवाद्यांपैकी किती जण जखमी झाले याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. 

या चकमकीत ठार झालेल्या सहा माओवाद्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. माओवाद्यांचा एक नेता मुत्तनगरी रेड्डी याने एप्रिल महिन्यात आंध्र प्रदेश पोलीस महासंचालकांसमोर शरणागती पत्करली होती. त्याला पकडून देणाऱ्यास २० लाख रुपयांचे इनाम पोलिसांनी जाहीर केले होते. त्यानंतर आणखी काही माओवादी नेते पोलिसांना शरण येणार, अशी चर्चा होती. नेमके त्याच वेळेस आंध्र प्रदेशमध्ये बुधवारी चकमक होऊन काही माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. माओवाद्यांचा एक नेता गजरला रवी ऊर्फ उदय याने आता आंध्र प्रदेश- ओडिशाच्या सीमेवरील भागात पुन्हा सक्रिय झाला आहे. मागील वर्षभर रवी हा छत्तीसगढमधील जंगलात लपून बसला होता. आता त्याला पकडण्यासाठी आंध्र प्रदेश पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.  (वृत्तसंस्था)

माओवादी नेत्यांचे पलायन? 
आंध्र प्रदेशमध्ये बुधवारी चकमक सुरू असताना माओवाद्यांचे काही नेते तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांना पकडण्यासाठी आंध्र प्रदेश पोलीस हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोध घेत 
आहेत. 

Web Title: Six Maoists killed in clashes with police in Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.