शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

मेघालयमध्ये मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश; 1525 किलो स्फोटके जप्त, 6 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 7:19 PM

Explosives Seized At Meghalaya : कारमधून दहा पेट्या जप्त करण्यात आल्या. या पेट्यांमध्ये 250  किलो स्फोटकं सापडली आहेत. 

शिलाँग - मेघालयात मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मेघालयच्या ईस्ट जयंतिया हिल्स जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि डिटोनेटर जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गाडीत मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानंतर बुधवारी रात्री या भागात पोलिसांनी सर्च ऑपरेशन हाती घेतलं.

सर्च ऑपरेशन दरम्यान लाडरिमबाई पोलीस चौकी भागातील कोंगोंगमध्ये एका गाडीला पोलिसांकडून रोखण्यात आलं. आसाममधील रजिस्टर क्रमांक असलेली गाडी पाहून पोलिसांना थोडा संशय आला. सहाय्यक पोलीस महानिरीक्षक जी के इंगराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमधून दहा पेट्या जप्त करण्यात आल्या. या पेट्यांमध्ये 250  किलो स्फोटकं सापडली आहेत. 

स्फोटकांमध्ये 2000 जिलेटीन कांड्याचाही समावेश होता. तसेच यासोबत 1000 डेटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी ही गाडी घेऊन जाणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. पोलिसांना आरोपींच्या चौकशीदरम्यान आणखी काही आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार खलीहरियट भागातून आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी घातलेल्या छाप्यात जवळपास 1275 किलो स्फोटके (10,200 जिलेटिन कांड्यांसहीत) 5000 डेटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. इंगराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत एकूण 1525 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध विस्फोटक कायदा आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक