घाटकोपर येथे तरुणाची हत्या करणारे ६ आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:52 IST2019-07-29T19:50:53+5:302019-07-29T19:52:28+5:30
ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

घाटकोपर येथे तरुणाची हत्या करणारे ६ आरोपी अटकेत
मुंबई - घाटकोपर येथे एका तरुणाची वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल रात्री हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नितेश सावंत उर्फ बंटी (३२) असे या मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी सहा जणांना पंत नगर पोलिसांनीअटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी बंटी आणि पाहिजे आरोपी बाबू केंदे यांच्यात वाद झाला होता. त्यातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
सात ते आठ जणाच्या जमावाने या तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी संकेत खरात(26), महेश शिवलकर(29), प्रसाद गपत(22), रोहन निकम(29), कमलेश होले(20) आणि यश इचले(19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बाबू केंदे याचा शोध पोलीस घेत आहेत.
मुंबई - घाटकोपर येथे ३२ वर्षीय नितेश उर्फ बंटी प्रकाश सावंत या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी ६ जणांना अटक https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2019