पुण्यातील गवसले तिहेरी हत्याकांडातील सहा आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 22:18 IST2019-10-10T22:18:06+5:302019-10-10T22:18:45+5:30
परतवाडा येथील श्यामा पहेलवानच्या हत्येनंतर लागोपाठ झालेल्या दोन हत्यांनी जुळे शहर थबकले होते. या प्रकरणातील सहा आरोपींना पुण्यातून अटक करण्यात स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.

पुण्यातील गवसले तिहेरी हत्याकांडातील सहा आरोपींना अटक
अमरावती: परतवाडा येथील श्यामा पहेलवानच्या हत्येनंतर लागोपाठ झालेल्या दोन हत्यांनी जुळे शहर थबकले होते. परतवाड्यात ३० सप्टेंबर रोजी दुपारी खुनी संघर्ष झाला होता. या प्रकरणातील सहा आरोपींना पुण्यातून अटक करण्यात स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. या सहा जणांच्या अटकेने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या ४२ वर पोहोचली आहे. गुरुवारी पुण्यातून पकडलेले सहा आरोपी वगळता अन्य ३६ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
संबंधीत घटनेतील काही आरोपी पुण्याला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक पोलिसांचे पथक पुण्यास पाठविण्यात आले. त्या पथकाने पुणे शहरातील वारजे पोलिसांच्या हद्दीतून १० आॅक्टोबर रोजी सहा आरोपींना अटक केली. अटक आरोपींमध्ये गोमू मनोहर कैथवास (२२, रा. बालाजीनगर, परतवाडा), राहूल उर्फ कालू घनशाम यादव (२३, रविनगर, परतवाडा), सिद्धांत राजू साबनकर (२१, पेंशनपुरा, परतवाडा), विशाल रामेश्वर मंडळे (२३, रविनगर, परतवाडा), विक्की सदानंद धाडसे (२७, पेंशनपुरा, परतवाडा) व चेतन ऊर्फ खाटीक ईश्वरलाल हिवरकर (२३, रा. परतवाडा) यांचा समावेश आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, पोलीस निरीक्षक सुनील किनगे, सदानंद मानकर, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, त्र्यंबक मनोहर, गजेंद्र ठाकरे, चेतन दुबे, योगेश सांभारे, प्रवीण अंबाडकर, चालक गणेश मांडोकर, प्रमोद फलके, श्रीकांत वाघ, आशिष भुमर, सागर धापड यांनी कारवाई केली.