शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
3
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
4
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
5
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
7
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
8
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
9
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
10
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
11
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
12
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

पेण हादरलं! घरातून उचलून नेऊन ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 4:46 PM

Rape And Murder : पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासीय पथकाने तात्काळ त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. 

ठळक मुद्दे या घटनेचा पेणच्या समस्त नागरिकांनी निषेध केला असून अती जलद न्यायालयात हा खटला चालवून आरोपीस फाशी देण्याची मागणी केली आहे.३४ वर्षीय नराधम आदेश मधुकर पाटील यास अटक करण्यात आली आहे.

दत्ता म्हात्रे 

पेण - सरत्या वर्षा अखेरीस माणुसकीला काळिमा फासणारी घटना पेणमध्ये घडली असून आदिवासी समाजाच्या ३ वर्षीय बालिकेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करून खून केल्याप्रकरणी ३४ वर्षीय नराधम आदेश मधुकर पाटील यास अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासीय पथकाने तात्काळ त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. 

 या घटनेचा पेणच्या समस्त नागरिकांनी निषेध केला असून अती जलद न्यायालयात हा खटला चालवून आरोपीस फाशी देण्याची मागणी केली आहे. या घटनेची दखल घेत रायगडचे पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण,गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी श्री. पोमन, पी.या आय कदम, पेण पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आदीं अधिकाऱ्याचे तापसी पथक कामाला लागले असल्याचे रायगड पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली. 

यावेळी माहिती देताना पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी सांगितले कि, पेण शहरानजिकच्या प्रायव्हेट हायस्कूल जवळच्या पांचोळा आदिवासीवाडी आदिवासी लोकवस्ती मधील ३ वर्षीय बालिकेवर तीच्या घरातून बुधवारी पहाटेच्या सुमारास घरातून उचलून नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला व तिची हत्या केली. याप्रकरणी आरोपीस अपहरण, बलात्कार, निर्घृण हत्या व पॉस्को, अट्रासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला असुन यामध्ये ३७६ (I),(J), ३६३, ३६६, (A), ४४८, ३०२, २०१, बाळ लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ४, ६ , ८ , १२, सह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार अधिनियम १९८९ सुधारणा कलम ८ (O), (W), (I), (II), ३( २) (V)  या कलम अंतर्गत गुणही दाखल करण्यात आले आहे. आरोपीवर अतिजलद न्यायालयात  खटला चालविण्याचा प्रयत्न करणार असल्याची अशी माहिती त्यांनी दिली. 

या घटनेची माहिती मिळताच अलिबागवरून श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास करून पुरावे गोळा करण्याचे काम केले. घटनेचे वृत्त पेणमध्ये पसरताच विविध संघटना, आदिवासी समाजातील लोक, राजकीय कार्यकर्ते यांनी पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठया संख्येने गर्दी केली होती. या वेळी कायदा सुव्यवस्था भंग होऊन नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक रुग्णालय परिसर व पोलीस स्टेशन परिसरात तैनात ठेवण्यात आली होती. यामुळे पेण मध्ये छावणीचे स्वरूप आले होते.  या अगोदर सुद्धा संबंधित आरोपीवर बलात्कार सारखा गुन्हा दाखल झालेला असून आरोपीने अशा प्रकरणात शिक्षा भोगुन आलेला असल्याची माहिती मिळाली आहे.  

 

माणूसकिला काळीमा फासणारी अपेक्षीत नसणारी निंदनीय घटना घडली आहे. याचा मी निषेध करते.दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे ती लवकरच व्हावी अशी माझीही मागणी आहे.पोलीस यंत्रणेने प्राथमिक स्तरावर जलद गतीने तपास करत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. आता जलद गती न्यायालयात खटला दाखल करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी रायगड जिल्ह्यातील नागरिक, पालकमंत्री म्हणून माझीही मागणी आहे. या कुटुंबातील सर्व सदस्य धीर देत आपण सर्वांनी या घटनेचा निषेध केला असून आता  या घटनेबाबत मी गृहमंत्री  अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला आहे. - आदिती तटकरे, पालकमंत्री,  रायगड

अत्यंत हृदय हेलावून टाकणारी घटना असून अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या ही केली जाते.अशा घटना राज्यात घडतात हा अतिरेक होत आहे.पूण्यातील घटना, रोह्यातील सामुहिक बलात्काराची घटना त्यानंतर पेण मधील ही घटना याबाबत गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांवर कायद्याचा धाक निर्माण होणे ही सरकारची जबाबदारी आहे.जामीनावर सुटलेले विकृत स्वरूपाचे मानसीक गुन्हेगार कायद्या अंतर्गत कडक शिक्षा मिळाली पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. -  प्रविण दरेकर, विरोधी पक्ष नेते

टॅग्स :MurderखूनRapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकpravin darekarप्रवीण दरेकर