बेडवर तडफडत होता पती, प्रियकरासोबत चॅंटींग करत होती पत्नी; प्रेमासाठी पतीला दिलं तिने विष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 17:36 IST2022-09-13T17:35:17+5:302022-09-13T17:36:54+5:30
Crime News : पीडितच्या वडिलांनी सांगितलं की, अजय बेडवर तडफडत होता आणि त्याची पत्नी प्रियकरासोबत चॅटींग करत होती.

बेडवर तडफडत होता पती, प्रियकरासोबत चॅंटींग करत होती पत्नी; प्रेमासाठी पतीला दिलं तिने विष
Crime News : प्रियकराच्या नादात काही महिला काहीही करतात. काही महिला तर पतीची हत्या करण्यासही मागे हटत नाहीत. याचा परिणाम काय होणार हे माहीत असूनही त्यांच्या डोक्यातून प्रेमाचं भूत जात नाही. अशीच एक घटना बिहारच्या सीतामढीमधून समोर आली आहे. प्रियकराचं प्रेम मिळवण्यासाठी पुतुल कुमारी नावाची महिला पतीला विसरली. ती प्रियकराच्या प्रेमात अशी काही वेडी झाली की, पतीच्या हत्येचा तिने प्लान केला. पीडितच्या वडिलांनी सांगितलं की, अजय बेडवर तडफडत होता आणि त्याची पत्नी प्रियकरासोबत चॅटींग करत होती. मात्र, पतीची हत्या करण्यात तिला यश मिळालं नाही. त्याला वेळीच डॉक्टरांकडे नेण्यात आलं. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पीडित तरूणाचं नाव अजय कुमार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतुल कुमारीने प्रियकराचं प्रेम मिळवण्यासाठी त्याच्या मदतीने पतीला जेवणातून विष दिलं होतं. पतीची तब्येत बिघडल्याने कुटुंबिय त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आधी त्याची स्थिती फार गंभीर होती. पण आता तो सुखरूप आहे.
असं सांगितलं गेलं की, ही घटना सोमवारी रात्रीची आहे. महिलेचा पती अजयने रात्री जेवण केलं. त्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली होती. त्यावेळी त्याची पत्नी त्याच्या सोबतच होती. पत्नीने पीडित पतीला रूममध्ये बंद केलं होतं. पीडित अजयच्या वडिलांनी सांगितलं की, अजय वेदनेने तडफडत होता आणि पत्नी प्रियकरासोबत चॅटींग करत होती. तिला पतीची अजिबात दया आली नाही. वडिलांनी सांगितलं की, अजयला धुसर दिसत होतं. त्यांनी लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
पीडितच्या वडिलांनी केला खुलासा
पीडित अजयच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या सूनेचं कुणासोबत तरी प्रेम प्रकरण सुरू आहे. पतीला मार्गातून दूर करण्यासाठी त्याने प्रियकरासोबत मिळून त्याच्या हत्येचा प्लान केला होता. महिला पतीसोबत बसली होती. तिने पतीच्या जेवणात विष टाकलं. पीडित अजयने पोलिसांना जबाब दिला. त्यात त्याने पत्नीवर आरोप केले. त्याने सांगितलं की, पत्नीसोबत त्याचा एक वर्षापासून कौटुंबिक वाद सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की, अजयच्या जबाबावरून पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे.