विकृतीचा कळस! सरबतमध्ये साखर अधिक झाल्याने बहीण - भावाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 21:05 IST2020-05-06T20:57:48+5:302020-05-06T21:05:59+5:30
रागाच्या भरात मोठ्या भावाने लहान भावासह बहिणीची देखील हत्या केली.

विकृतीचा कळस! सरबतमध्ये साखर अधिक झाल्याने बहीण - भावाची हत्या
पेशावर - रमझान महिन्यात सुरु असलेल्या इफ्तार पार्टीमध्ये दिलेल्या सरबतमध्ये साखर जास्त झाल्याने वादंग निर्माण झाला. या वादातून मोठ्या भावाने सख्या बहीण - भावाची गोळ्या घालून हत्या केली असल्याची घटना घडली.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रातांची राजधानी असलेल्या पेशावरमध्ये ही घटना घडली आहे. मिठरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपीने बहिणीला सरबत करण्यास सांगितले. मात्र, सरबतमध्ये साखर जास्त झाली. त्यावरून आरोपी आणि बहिणीमध्ये वाद निर्माण झाला. या दोघांमधील वादाचं हत्येत पर्यवसन झाले. या भांडणात लहान भाऊ मध्यस्थी करू लागला. नंतर रागाच्या भरात मोठ्या भावाने लहान भावासह बहिणीची देखील हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले असून पोलीस त्याच्या शोधात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. इतर देशाप्रमाणे पाकिस्तानमध्ये देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे लोकं घरातच असल्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. इशाक असं या आरोपीचं नाव आहे. त्याला अटक करण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.