सोपाऱ्यातून बहिण भावाचे अपहरण, पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 00:18 IST2019-06-28T00:17:39+5:302019-06-28T00:18:49+5:30

भाऊ आणि बहिणीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.

Sister & brother kidnapped In Nala Sopara | सोपाऱ्यातून बहिण भावाचे अपहरण, पोलिसांत गुन्हा दाखल

सोपाऱ्यातून बहिण भावाचे अपहरण, पोलिसांत गुन्हा दाखल

नालासोपारा - पूर्वेकडील अग्रवाल नगरमध्ये राहणा-या आणि भांडी विक्र ीचा व्यवसाय करणा-या महिलेचे मुलगा आणि मुलगी मित्रांसोबत मंगळवारी दुपारी गेले होते. पण ते अद्यापपर्यंत घरी परतलेच नाही. तुळींज पोलिसांनी भाऊ आणि बहिणीचे कोणीतरी फूस लावून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.
पूर्वेकडील अग्रवाल नगरमधील फायर ब्रिगेडजवळील श्रद्धा बिल्डिंगमधील सदनिका नंबर १ मध्ये विद्या राजू हातांगळे (३२) ही आपल्या परिवारासोबत राहत असून भांडी विक्र ीचा व्यवसाय करतात. त्यांची १५ वर्षाची मुलगी साक्षी आणि ७ वर्षाचा मुलगा लकी हे दोघे भाऊ बहीण मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नवनीत यादव आणि इमरान या मित्र मंडळीसोबत फिरण्यासाठी गेले होते. पण ते अद्यापपर्यंत घरी परतलेच नाही. आईने सगळीकडे शोध घेऊन सापडले नाही म्हणून तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन बुधवारी तक्र ार दिली आहे.

कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा आईकडून संशय व्यक्त
मित्रांसोबत गेले होते मौजमजा करायला

Web Title: Sister & brother kidnapped In Nala Sopara