"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:33 IST2025-07-09T11:31:51+5:302025-07-09T11:33:20+5:30

पीडित पती पिंटूने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडली.

"Sir, my wife ran away"; Mother of 4 absconding with boyfriend; Husband runs to the police! He said... | "साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 

"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 

 हरदा जिल्ह्यातील डबल फाटक परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. या परिसरात राहणारी चार लहान मुलांची आई अचानक घरातून बेपत्ता झाली आहे. पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित पती पिंटूने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडली. पिंटूने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून एका अज्ञात युवकाशी सतत फोनवर बोलत होती. मंगळवारी सकाळी तिने कोणालाही काहीही न सांगता आपल्या चार निष्पाप मुलांचा काहीही विचार न करता घर सोडले आणि ती कुठे गेली, हे कुणालाही माहीत नाही.

पतीच्या संशयाची सुई प्रियकराकडे!
पिंटूने असा आरोप केला की, पत्नीने अचानक घर सोडण्याचा निर्णय घेतला, कारण ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. पत्नीच्या फोन कॉल्स आणि त्यांच्यातील संशयास्पद संबंधांबद्दल त्याला आधीपासूनच शंका होती, पण त्याने कधीही या गोष्टीची खात्री केली नव्हती. आता मात्र, मुलांसहित त्याला वाऱ्यावर सोडून पत्नीने हे पाऊल उचलल्याने त्याच्या संशयाला दुजोरा मिळाला आहे.

पोलिसांकडून तातडीने तपास सुरू
पतीने तक्रार दाखल करताच, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी मिळालेल्या माहितीनुसार, फरार झालेली महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स तपासले जात आहेत.

यासोबतच, आसपासच्या सर्व परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे, जेणेकरून महिला आणि तिच्या प्रियकराला लवकरत लवकर शोधून काढता येईल. पोलिसांनी सांगितले की, "तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर येईल. सध्या, मुलांची काळजी कुटुंबातील इतर सदस्य घेत आहेत."

पतीला फक्त पत्नी परत हवी!
या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. लोक या घटनेबद्दल आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक जण या लहानग्या मुलांच्या भवितव्याबद्दलही चिंता व्यक्त करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना या प्रकरणी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

पती पिंटूने हताश होऊन पोलिसांना सांगितले की, "मी पत्नीशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कोणालाही प्रतिसाद देत नाहीये. मला फक्त माझी पत्नी लवकरात लवकर आणि सुखरूप घरी परत हवी आहे."

Web Title: "Sir, my wife ran away"; Mother of 4 absconding with boyfriend; Husband runs to the police! He said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.