सुंदरी समजून गायकाने ठगालाच पाठविला स्वत:चा अश्लील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:22 AM2021-06-14T06:22:08+5:302021-06-14T06:25:53+5:30

गेल्या महिन्यात सोशल मीडियाद्वारे गायकाची तरुणीसाेबत ओळख झाली. मात्र, ती तरुणी नसून ठग हाेता.

singer sent his own pornographic video to the thug | सुंदरी समजून गायकाने ठगालाच पाठविला स्वत:चा अश्लील व्हिडिओ

सुंदरी समजून गायकाने ठगालाच पाठविला स्वत:चा अश्लील व्हिडिओ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुंदरी समजून गायकाने ठगालाच स्वतःचा अश्लील व्हिडिओ पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. ठगाने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळण्यास सुरुवात करताच गायकाने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

गेल्या महिन्यात सोशल मीडियाद्वारे गायकाची तरुणीसाेबत ओळख झाली. मात्र, ती तरुणी नसून ठग हाेता. पुढे संवाद वाढताच याच ठगाने तरुणीचा अश्लील व्हिडिओ गायकाला पाठवण्यात आला आणि तो स्वत:चा व्हिडिओ असल्याचे सांगून त्याला जाळ्यात ओढण्यात आले. व्हिडिओ पाहून गायकही त्या सुंदरीच्या प्रेमात पडला. पुढे, गायकालाही तसाच व्हिडिओ पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानेही कसलाच विचार न करता व्हिडिओ शेअर केला.

पुढे हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ठगाने सव्वा लाख उकळले. पुढे आणखी पैशांची मागणी होताच गायकाने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: singer sent his own pornographic video to the thug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.