शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'सिम स्वॅपिंग' द्वारे होईल तुमचे बँक खाते रिकामे; सायबर पोलिसांकडे ५ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 21:34 IST

गोपनीय माहिती शेअर करु नका

ठळक मुद्देसिमकार्डच्या मागील सिम कार्ड नंबर हा गोपनीय असून तो कधीही कोणाशी शेअर करु नये.आपली खासगी माहिती सोशल मिडियावर अपलोड करु नये

 

पुणे : स्मार्ट फोन वापरताना थोडासा निष्काळजीपणा केल्यास ही चोर तुमच्या सीम कार्डमधील सर्व माहिती क्लोन व स्वॅपिंगद्वारे मिळवून तुमचे बँक खाते रिकामे करु शकते. ते ही अगदी काही मिनिटात. सायबर चोरांनी सध्या चोरीसाठी ही नवीन शक्कल शोधली आहे. सायबर पोलीस ठाण्यात आतापर्यंत अशा ५ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड सायबर चोरटे सहजपणे स्वॅप करु शकतात. त्यामुळै अनोळखी व्यक्तीशी बोलताना खास करुन मोबाईल कंपनीचा प्रतिनिधी असेल तर केलेली छोटीशी चुक आपल्याला मोठा आर्थिक फटका देऊ शकते. त्यामुळे एखाद्या टेलिकॉम कंपनीच्या नावे फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने सिमकार्डनंबर विचारला तर तो कोणत्याही परिस्थितीत सांगू नका. सायबर पोलीस ठाण्यातअशा प्रकारे ५ गुन्हे दाखल असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.............................

काय आहे सिम स्वॅपिंग....या प्रकारामध्ये एखाद्या सिम कार्डचे डुप्लिकेट सिमकार्ड तयार केले जाते. कॉल करणारा आपण मोबाईल कंपनीकडून बोलत असल्याचे भासवून कॉल ड्रॉप,  इंटरनेट स्पीड आदी त्रुटी दूर करण्याची बतावणी करुन तुमची माहिती काढून घेतो.त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक २० अंकी सिमकार्ड नंबर चा एसएमएस पाठवितो. हा एसएमएस तुमच्या मोबाईलवर न १२३४५ या क्रमांकावर फॉरवर्ड करण्याससांगतो. हा एसएमएस फॉरवर्ड केल्यानंतर तुमचे सिमकार्डचे नेटवर्क बंद होऊनतुमचा मोबाईल क्रमांक आरोपीकडील सिमकार्डवर सुरु होतो. त्यामुळे आपल्या बँकेकडून येणारे ओ टी पी व एस एम एस याचा वापर करुन आरोपी आपल्या बँक खात्यातून पैसे काढून घेतो. अशा प्रकारे नागरिकांची फसवणुक केली जाते. बहुतांश प्रकरणात फोन करणार्‍या व्यक्तीकडे आपला बँकिंग आयडी आणि पासवर्ड असतो. त्यांना फक्त ओ टी पी नंबरची गरज असते. तो सिम नंबरवर येतो. ओ टीपी येताच आपल्या बँक अकाऊंटमधून रक्कम ट्रान्सफर केली जाते. या सिम स्वॅपिंगद्वारे काही मिनिटात तुमच्या बँक खात्यात असलेली सर्व रक्कम काढून घेतले जाऊन तुमचे बँक खाते रिकामे केले जाते. एका प्रकरणामध्ये तक्रारदार याच्या खात्यावर कर्ज काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे........याबाबत जयराम पायगुडे यांनी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी, त्याचा सूचनादिल्या आहेत.

* कोणतीही मोबाईल कंपनी ग्राहकांना अशा प्रकारे फोन करुन माहिती विचारत नाही.* फसवणूक करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राच्या बाहेरील इतर राज्यातून बोलत असते. त्यामुळे कोणताही फोन आल्यावर तो कोठून बोलत आहे, हे लक्षात येते.* सिमकार्डच्या मागील सिम कार्ड नंबर हा गोपनीय असून तो कधीही कोणाशी शेअर करु नये.* सिम नंबर कोणत्याही अनोळखी नंबरवर फॉरवर्ड करु नये. तसेच आपली खासगी माहिती सोशल मिडियावर अपलोड करु नये.* असा प्रकार आपल्याबरोबर घडल्या तात्काळ आपल्या टेलिफोन कंपनीच्या केअरशी व बँकेशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी. बँक खात्याशी लिंकअसणारा मोबाईल क्रमांक बदलून घ्यावा किंवा बंद करावा.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम