Sidhu Moose Wala Murder: सिद्धूच्या हत्येवरून पंजाबात गँगवॉरची शक्यता; गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 14:11 IST2022-05-30T14:09:16+5:302022-05-30T14:11:47+5:30

लॉरेन्स बिश्नोईचे मृत गँगस्टर विक्की गौंडर आणि बंबीहा टोळीशी अनेक वर्षांपासूनचे वैर आहे. विक्की गौंडर कुठे आहे याची टीप देखील लॉरेन्स बिश्नोईनेच पोलिसांना दिल्याचे सांगितले जाते. 

Sidhu Moose Wala Murder: Gangwar likely in Punjab over Sidhu's murder; gangster vicky gounder's gand threatens Gangster Lawrence Bishnoi, Goldie Brar | Sidhu Moose Wala Murder: सिद्धूच्या हत्येवरून पंजाबात गँगवॉरची शक्यता; गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी

Sidhu Moose Wala Murder: सिद्धूच्या हत्येवरून पंजाबात गँगवॉरची शक्यता; गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणी आठ जणांचा समावेश होता, ही बाब आता समोर आली आहे. दोघांनी फायर केली, सहा जण त्यांना कव्हर देण्यासाठी होते. दोन कार मूसावालाच्या मागावर होत्या. त्याच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रार यांची नावे समोर येत आहेत. 

थार थार थार...! एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची धमक; सिद्धू मूसेवालावर याच रायफलने हल्ला झाला

आता या प्रकरणाचा छडा लावण्यात यश येत नाही तोच, पंजाबमध्ये गँगवॉर सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मृत गँगस्टर विकी गौंडरच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये गौंडर ब्रदर ग्रुप आणि बंबीहा गँग यांनी एकत्र मिळून लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी दिली आहे. याचे परिणाम भोगावे लागतील, सिद्धूच्या हत्येचा बदला घेणार, अशी धमकी देण्यात आली आहे. 

विकी गौंडर ब्रदर्स ग्रुपच्या नावाने एक पोस्ट शेअर झाली आहे. बिश्नोई आणि गोल्डी ने मूसावालाची हत्या केली आहे. त्याचा बदला घेतला जाईल, लवकरच आमना सामना होईल असे यात म्हटले आहे. विकी हा पंजाब, हरियाणा, हिमाचल, राजस्थान आणि आजुबाजुच्या क्षेत्रातील मोठा गँगस्टर होता. त्याला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये मारले होते. या दोन्ही गँग मिळून बिश्नोईला संपविण्याची घोषणा करत आले आहेत.

लॉरेन्स बिश्नोईचे मृत गँगस्टर विक्की गौंडर आणि बंबीहा टोळीशी अनेक वर्षांपासूनचे वैर आहे. विक्की गौंडर कुठे आहे याची टीप देखील लॉरेन्स बिश्नोईनेच पोलिसांना दिल्याचे सांगितले जाते. 
 

Web Title: Sidhu Moose Wala Murder: Gangwar likely in Punjab over Sidhu's murder; gangster vicky gounder's gand threatens Gangster Lawrence Bishnoi, Goldie Brar