Siddhu Moosewala : गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सना दिल्ली पोलिसांनी गुजरातमधून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:04 IST2022-06-20T16:28:01+5:302022-06-20T17:04:01+5:30
Siddhu Moosewala Case : एके ४७ सारखी रायफल, पिस्तूल आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

Siddhu Moosewala : गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सना दिल्ली पोलिसांनी गुजरातमधून केली अटक
सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्लीपोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तिघांनाही गुजरातमधील मुंद्रा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून एके ४७ सारखी रायफल, पिस्तूल आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या शूटर्सपैकी प्रियव्रत फौजी असे एकाचे नाव आहे. फौजी हा हरियाणाचा गुंड आहे. फतेहाबाद पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये हा गुंड कैद झाला आहे. २६ वर्षीय प्रियव्रत फौजी हा हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गढी सिसाना येथील रहिवासी आहे. तो शूटर्सच्या संपूर्ण मॉड्यूलचा प्रमुख आहे. हत्येच्या वेळी फौजी थेट गोल्डी ब्रारच्या संपर्कात होता. या फौजीवर यापूर्वीही दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. ही दोन्ही प्रकरणे सोनीपतमधील आहेत.
Sidhu Moose Wala murder case | Two main shooters including a module head of shooters arrested, a large number of arms & explosives recovered: Delhi Police Special Cell
— ANI (@ANI) June 20, 2022
कशिश कुलदीप असे अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या शूटरचे नाव आहे. कुलदीप (२४) हा हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील सज्यान पाना गावातील प्रभाग क्रमांक ११ चा रहिवासी आहे. हा आरोपी देखील घटनेपूर्वी फतेहगढ पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता. 2021 मध्ये हरियाणातील झज्जर येथे झालेल्या हत्येतही त्याचा सहभाग आहे.
#WATCH | Delhi Police Special Cell briefs the media on Sidhu Moose Wala murder case https://t.co/oxhcr7kyQN
— ANI (@ANI) June 20, 2022