शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Shraddha Walker Murder Case: दररोज रात्रीची ठराविक वेळ अन् एकसारखे दिसणारे कपडे, बॅग; आफताबने पुढचाही विचार केलेला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:38 IST

Shraddha Walker Murder Case: फॉरेन्सिक लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफी चाचणी सुरु झाल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली/मुंबई- श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची प्रकृती ठीक नसल्याने रखडलेली पॉलिग्राफ चाचणी गुरुवारी पार पडली. मात्र, त्याला सर्दी झाल्याने, सतत शिंका येत असल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही. ती शुक्रवारी पुढे सुरु राहिली. कदाचित उद्याही ही चाचणी केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चाचणीत आफताब त्याच्या आणि श्रद्धाच्या संबंधांबाबत थोडी परस्परविरोधी माहिती दिल्याने सोमवारच्या चाचणीतील त्याच्या उत्तराकडे लक्ष लागले आहे. आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत.

अधिकाऱ्यांचा तो एक प्रश्न अन् आफताब लगेच पाणी मागू लागला; चौकशीत काय घडलं?

हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून आफताबने ते नव्या फ्रीजमध्ये ठेवले होते. नंतर रोज तो मध्यरात्री त्यांची विल्हेवाट लावत होता. तो ज्या मार्गाने जात होता, त्यावरील तीन महत्त्वाची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत शेकडो तासांचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे. त्यांची छाननी करण्याचे, त्याचे विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. 

आफताबने दररोज विशिष्ट वेळी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे कामही मुद्दाम केल्याचे पोलिसांच्या १२ दिवसांच्या तपासात दिसले. तो ठराविक वेळी, एकसारखे दिसणारे कपडे बॅग घेऊन मुद्दाम जात होता. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून गोळा करून सादर करायचे झाले तर ते एकसारखे दिसेल. ते एकच फुटेज वाटेल आणि तपास अधिकारी खोटे पुरावे सादर करत असल्याचा प्रत्यारोप करता येईल, असे दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक फुटेज काळजीपूर्वक पाहून त्याच्या बारकाईने नोंदी करण्याचे, ते फुटेज अस्सल असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान आमच्यापुढे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, रोहिणीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफी चाचणी सुरु झाल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारताच तो थोडा अस्वस्थ झाला व पाणी मागू लागला. त्यानंतर आफताबने शांतपणे उत्तरे दिली. त्याच्यावर कोणताही ताण नव्हता, तो शांतपणे चाचणीला सामोरा गेला. चाचणीत त्याला ४० ते ५० प्रश्न विचारण्यात आले. नियोजित पद्धतीने हत्या केली की रागातून? मृतदेहाचे तुकडे करण्याचा व फेकण्याचा निर्णय का घेतला? मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला? शस्त्रे कुठे लपविली? हे प्रश्न त्याला विचारले. हे प्रश्न हिंदीत विचारले आणि त्याने याची इंग्रजीतून उत्तरे दिल्याचेही कळते.

बद्रीही संशयाच्या भोवऱ्यात

छत्तरपूर पहाडीच्या जंगलात आडबाजूला आफताबला घर भाड्याने देणारा त्याचा मित्र बद्रीही संशयाच्या भोवऱ्यात असून, पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. याच घराजवळच्या जंगलाच्या भागात श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले होते, आफताब आणि श्रद्धाची हिमाचल प्रदेशात ब्रदीशी ओळख झाली होती. त्यानंतर ब्रदीने आफताबला घर भाड्याने दिले होते. त्याला हत्येची कल्पना होती, त्याचा सहभाग आहे का याबाबत चौकशी होणार आहे.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरDeathमृत्यूPoliceपोलिस