शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

किती क्रूर होता आफताब? श्रद्धासोबतच्या ३४ मिनिटांच्या ऑडिओ क्लीपनं मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 9:42 AM

श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांनी आफताबविरोधात कोर्टात ऑडिओ क्लीप सादर केली.

नवी दिल्ली - श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांनी कोर्टात आरोपी आफताबविरोधात सबळ पुरावे मिळाल्याचा दावा केला. आफताबला दोषी ठरवण्यासाठी हा ठोस पुरावा असल्याचं म्हणत पोलिसांनी ३४ मिनिटांची ऑडिओ क्लीप कोर्टासमोर ठेवली. त्यात आरोपी आफताबचा क्रूर चेहरा समोर आला आहे. श्रद्धानं मानसोपचार तज्ज्ञांशी केलेल्या संवादाची ही क्लीप आहे. ज्यात आफताबनं तिला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला असं श्रद्धानं म्हटलं आहे. 

श्रद्धानं मानसोपचार तज्ज्ञांना सांगतेय की, आफताबनं मला वारंवार मारण्याची धमकी दिली होती. मला त्याने मारायला नको होते. काही समस्या असेल तर त्यावर बोलून तोडगा काढायला हवा होता. तर मी असा व्यक्ती नाही असं आफताब म्हणत होता. श्रद्धा आणि आफताबचं काऊन्स्लिंग सेशन कधी बूक केले होते आणि किती सेशन दोघांनी हजेरी लावली याबाबत माहिती नाही. परंतु श्रद्धा आणि आफताबचं ऑडिओ रेकोर्डिंगमुळे आफताब श्रद्धाला मारहाण करायचा आणि एकदा बेशुद्ध केले होते याचा खुलासा झाला. 

३४ मिनिटांची ऑडिओ क्लीप...३४ मिनिटांच्या या ऑडिओ क्लीपमध्ये श्रद्धा मानसोपचार तज्ज्ञांना तिची कहानी सांगत होती. आफताबनं कितीवेळा मला मारण्याचा प्रयत्न केला हे मला माहिती नाही. परंतु ही पहिली वेळ नाही जेव्हा त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. आज जवळपास दोनदा त्याने मला मारहाण केली. ज्यारितीने आफताबनं माझी मान पकडली, माझ्या डोळ्यासमोर सर्व अंधार पसरला होता. मला ३० सेकंद श्वासही घ्यायला आला नाही. कसेतरी मी त्याचे केस ओढून स्वत:चा बचाव केला असं श्रद्धाने म्हटलं. 

जेव्हा आफताब माझ्याजवळ असायचा तेव्हा मी घाबरत घाबरत जगत होती. तो मुंबईतही माझ्या आसपास राहायचा. तो मला मुंबईत शोधून काढेल आणि मारण्याचा प्रयत्न करेल याची भीती मला कायम वाटायची. आफताबची वृत्ती मला मारण्याची होती. आफताबनं केवळ मला मारहाण आणि शारिरीक हिंसा केली नाही तर मला जीवे मारण्याचाही प्रयत्न करत होता. ही पहिलीच वेळ नाही जेव्हा त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला असं श्रद्धा ऑडिओ क्लीपमध्ये बोलताना ऐकायला येते. 

"मला कधी असं व्हायचं नव्हते..."तर सेशनमध्ये आफताबने तिला म्हटलं की, मला कधी असे व्हायचे नव्हते. तू मला मारतोय, प्लीज असे करू नकोस, आपल्याला बोलायला हवं, २ वर्ष मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतेय असं श्रद्धा आफताबला सांगतेय. सरकारी वकिलांनुसार, श्रद्धा आणि आफताबनं ३ वेळा मानसोपचार तज्ज्ञांची वेळ बूक केली होती. त्यातील एकदा रद्द करण्यात आली होती. सध्या या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू असून पुढील सुनावणी २५ मार्चला होणार आहे.  

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCourtन्यायालय