शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Shraddha Murder Case: श्रद्धा होती गर्भवती? मित्रांबरोबरच्या चॅटवरून पोलिसांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 13:15 IST

Shraddha Murder Case: वसईतील श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येमुळे एकीकडे संताप व्यक्त होत असतानाच दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. श्रद्धा हिने आफताबबरोबर प्रेमप्रकरणामुळे कुटुंबाशी संबंध तोडले होते, मात्र ती आपल्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात होती.

वसई : वसईतील श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येमुळे एकीकडे संताप व्यक्त होत असतानाच दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. श्रद्धा हिने आफताबबरोबर प्रेमप्रकरणामुळे कुटुंबाशी संबंध तोडले होते, मात्र ती आपल्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात होती. त्यातूनच तिने आपल्या मित्रांना मी लवकरच गुड न्यूज देणार आहे, असे सांगितल्याचे उघड होत आहे. यावरून ती हत्येआधी गर्भवती होती का? याचाही तपास पोलिस करीत आहेत. 

 वालकर हिच्या प्रेमसंबंधांना तिच्या आईवडिलांचा विरोध होता. मात्र, तिने आफताबच्या प्रेमात वेडी होऊन घरच्यांबरोबरचे संबंध तोडले होते. त्यामुळे तिच्या आईची प्रकृती खालावून तिचे २०२१ मध्ये निधन झाले. श्रद्धा आणि आफताब काही काळ वसईतील एव्हरशाइन परिसरात भाड्याने घर घेऊन राहात होते. त्यानंतर ते दिल्लीमध्ये राहायला गेले होते. श्रद्धाला आफताब मारहाण करीत होता, मात्र तरीही ती त्याच्याबरोबरच का राहात होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कदाचित ती त्याच्यापासून गर्भवती होती, म्हणूनही ती त्याच्याबरोबर राहात असावी, असे तिच्या काही मित्र-मैत्रिणींचे म्हणणे आहे. श्रद्धाने व्हाॅटसॲपवर मित्र-मैत्रिणींशी बोलताना मी लवकरच गुड न्यूज देणार आहे, असे म्हटल्याचे आता सांगितले जात आहे. ही गुड न्यूज म्हणजे ती गर्भवती असावी, असाही अंदाज वर्तवला जात आहे. याबाबतही पोलिस अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.

श्रद्धाच्या मोबाइलचा भाईंदर खाडीत शोधनालासोपारा : वसईच्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने देशभर संताप व्यक्त होत असून, गेल्या आठवडाभरापासून दिल्ली पोलिस आणि माणिकपूर पोलिस या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विविध स्तरावर शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपी आफताब याने पुरावा नष्ट करण्यासाठी श्रद्धाचा मोबाइल भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. दिल्ली पोलिस गेला आठवडाभर वसईमध्ये या प्रकरणाचा छडा लावण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. माणिकपूर पोलिसांच्या साह्याने ही शोधमोहीम सुरू आहे. भाईंदरच्या खाडीमध्ये रेल्वे लाइनच्या परिसरात बोटींच्या साह्याने श्रद्धाचा मोबाइल शोधला जात आहे. या गुन्ह्यामध्ये श्रद्धाचा मोबाइलही महत्त्वाचा ऐवज ठरणार आहे.मागील पाच ते सहा दिवसांपासून दिल्ली आणि माणिकपूर पोलिस श्रद्धाचे  मित्र-मैत्रिणी, डॉक्टर, वडील, घरमालक, सोसायटीचे पदाधिकारी यांचे जाबजवाब नोंदवत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब हा काही काळ तिचा मोबाइल वापरत होता. मात्र, त्यामुळे आपण अडचणीत येऊ, ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिचा मोबाइल नष्ट करण्यासाठी भाईंदरच्या खाडीत टाकल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गुरुवारी दोन बोटींच्या साह्याने दिल्ली पोलिस माणिकपूर पोलिसांच्या मदतीने भाईंदरची खाडीत शोध घेत होते.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी