सिडको येथे दुकान फोडून चोरट्यांनी २५ किलो चांदी केली लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:36 IST2018-08-02T13:35:25+5:302018-08-02T13:36:37+5:30

सिडको कॅंनॉट परिसरातील सोन्या-चांदीचे दुकान चोरट्यांनी फोडून दुकानातील २५ किलो चांदी लंपास केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

The shops broke out at CIDCO by stealing 25 kg of silver | सिडको येथे दुकान फोडून चोरट्यांनी २५ किलो चांदी केली लंपास 

सिडको येथे दुकान फोडून चोरट्यांनी २५ किलो चांदी केली लंपास 

औरंगाबाद : सिडको कॅंनॉट परिसरातील सोन्या-चांदीचे दुकान चोरट्यांनी फोडून दुकानातील २५ किलो चांदी लंपास केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

शहरातील कॅंनॉट परिसरात  रीखाबलाल हिंगड यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. बुधवारी रात्री ९ वाजता ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. आज सकाळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. हिंगड यांनी दुकानात पाहणी केली असता त्यांना दुकानात ठेवलेली २५ किलो चांदी चोरीस गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी याची माहिती तत्काळ सिडको पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असून अधिक तपास सुरु आहे .  

Web Title: The shops broke out at CIDCO by stealing 25 kg of silver