शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदाराने १५ मोबाईल वितरकांना घातला ९० लाखांचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 14:17 IST

मोबाईल दुकान सुरु करुन त्यासाठी उधारीवर मोबाईल, टीव्ही घेऊन त्याचे पैसे न देताच १५ मोबाईल वितरकांना ९० लाख रुपयांचा गंडा घालून दुकानदार पळून गेल्याचे उघडकीस आले आहे़. 

ठळक मुद्देआरोपी मूळचे राजस्थानमधील सिरोड जिल्ह्यातील राहणारे सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल २ हजार ४३६ मोबाईल, २ हजार १५६ अक्सेसरीज आणि १२ टीव्ही असा माल उधारीवर

पुणे : मोबाईल दुकान सुरु करुन त्यासाठी उधारीवर मोबाईल, टीव्ही घेऊन त्याचे पैसे न देताच १५ मोबाईल वितरकांना ९० लाख रुपयांचा गंडा घालून दुकानदार पळून गेल्याचे उघडकीस आले आहे़. हा प्रकार मार्च ते ८ नोव्हेंबर २०१८ दरम्यान बालाजीनगर येथील अनमोल टेलिकॉम येथे हा प्रकार घडला आहे़. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी माधुसिंग गिरीधरसिंग राजपूत (रा़ बालाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी संजय शहा (वय ५३, रा़ कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहा यांचे कॅम्पमध्ये दुकान असून त्यांचा पॉवर टेलिकॉम या नावाने नवीन मोबाईल वितरणाचा व्यवसाय आहे़. अनमोल टेलिकॉमचे मालक राजपूत यांनी बालाजीनगर येथे तात्पुरते मोबाईलचे दुकान सुरु केले़. विक्रीसाठी शहा आणि इतर १४ वितरकांकडून उधारीवर माल घेऊन काही दिवस व्यवस्थित व्यवहार करुन त्यांचा विश्वास संपादन केला़. त्यानंतर काही दिवसांनी शहा व इतर १४ मोबाईल वितरकांकडून त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे २ हजार ४३६ मोबाईल व २ हजार १५६ वेगवेगळी अक्सेसरीज आणि १२ टीव्ही असा ९० लाख ९६ हजार ३५५ रुपयांचा माल उधारीवर घेतला़. त्यानंतर राजपूत यांनी परस्पर दुकान बंद करुन ते पळून गेले़. राजपूत हे मूळचे राजस्थानमधील सिरोड जिल्ह्यातील राहणारे आहेत़ दुकानही बंद आणि संपर्क होत नसल्याने शेवटी शहा यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल