शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दुकान उघडण्याचे आदेश व्हॉटसॲप स्टेटसवर, पोलिसांची कारवाई दुकानदारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:58 IST

Police action on shopkeepers : तातडीने आदेश काढण्याची सूचना; व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सामंत बाजारपेठेत दाखल

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी लेखी आदेश नसल्याचे कारण देत पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव केला. 

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम साहित्यांची दुकाने उघडण्याची परवानगी तहसीलदार यांनी व्हॉट्स ॲप स्टेटसवरुन दिली. मात्र, मंगळवारी दुकाने उघडताच पोलिसांनी कारवाईचा तडाखा लावला. व्यापाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करताच मंत्री उदय सामंतरत्नागिरीत दाखल झाले. पुढील आठ दिवस दुकान ९ ते १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्याची सूचना त्यांनी केली.

रविवारपासून जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. शहरी आणि ग्रामीण भागातही अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे घर दुरुस्तीसाठी आवश्यक सामान नागरिकांना मिळावे या हेतूने रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी फक्त बांधकाम साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी दिली. मात्र, वादळ परिस्थितीतील नुकसानीचे पंचनामे इत्यादी कामे सुरू असल्याने त्यांनी तातडीने जनतेला कळावे यासाठी त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटस वर तसा मेसेज ठेवला. मात्र, मंगळवारी सकाळी लेखी आदेश नसल्याचे कारण देत पोलिसांनी ही दुकाने उघडण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव केला. 

ही घटना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कळताच त्यांनी आपला नियोजित दौरा सोडून व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रत्नागिरी बाजारपेठेत धाव घेतली. वादळ परिस्थितीमुळे जनतेला घर दुरुस्तीसाठी व बांधकामासाठी साहित्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची दुकाने पुढील आठ दिवस सकाळी ९ ते १ सुरु ठेवण्याबाबत आदेश काढण्याच्या सूचना उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या असून, तसे आदेश काढण्यात येणार आहेत.

मात्र, लेखी आदेश नाही म्हणून कारवाईत तत्परता दाखविणाऱ्या पोलिसांबाबत नाराजीचा सूर उमटत आहेत. तहसीलदार यांनी व्हॉट्स ॲप स्टेटसवरुन दिलेल्या आदेशामुळे यापूर्वीही वाद झाला होता. हे आदेश पोलीस प्रशासन ग्राह्य धरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांना दंडाची रक्कम परत मिळणार का, ही कारवाई मागे घेणार का, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी