शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sidhu Moose wala Murder: मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडणारे शूटर्स अटकेत, एके-४७ रायफलचा केला वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 06:49 IST

Sidhu Moose wala Murder: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दोन शार्प शूटरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.  प्रियव्रत फौजी आणि कशिश अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे  एका साथीदारासोबत गुजरातच्या मुंद्रा बंदरानजीक  भाड्याच्या  घरात दडी मारून होते.

- बलवंत तक्षक  चंडीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दोन शार्प शूटरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.  प्रियव्रत फौजी आणि कशिश अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे  एका साथीदारासोबत गुजरातच्या मुंद्रा बंदरानजीक  भाड्याच्या  घरात दडी मारून होते.

प्रियव्रत फौजी हा हरयाणातील सोनीपत जिल्ह्यातील गढी सिसानाचा आणि कशिश ऊर्फ कुलदीप झज्जर जिल्ह्यातील बेरी गावाचा आहे. भटिंडाच्या केशवलाही जेरबंद करण्यात आले आहे. फौजी याच्यावर २५ हजार रुपयांचा इनाम आहे.

पोलिसांनुसार मुसेवाला हत्याकांडात सहा शार्पशूटर्स सामील होते. त्यांनी मुसेवालावर बॉम्ब हल्ला करण्याचाही बेत आखला होता. मुसेवालाची हत्या केल्यानंतर शार्प शूटर्संनी कॅनडातील गोल्डी बराडला फोन करून काम झाल्याचे कळविले होते. दोन पथके मुसेवालाची हत्या करण्यासाठी बराडच्या संपर्कात होते, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे.  यापैकी बोलेरो कार कशिश चालवित होता, तर कारमध्ये फौजीसोबत अंकित सेरसा आणि दीपक मंडी होता. दुसरे वाहन (कोलोरा) जगरुप चालवित होता. या वाहनात मनप्रीत मन्नू त्याच्यासोबत होता.  सर्वात आधी शार्पशूटर मन्नूने एके-४७ रायफलीतून मुसेवालावर  गोळी झाडली. त्यानंतर दोन्ही वाहनांतील सर्व सहा शूटर्संनी  खाली उतरून  मुसेवालावर गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले.

मुसेवालाच्या हत्येनंतर मन्नू आणि जगरुप वेगळ्या दिशेने गेले;  केशव त्यांना गाडीतनू हरयाणातील फतेहाबादला घेऊन आला. नंतर  ते  लपत-छपत गुजरातला गेले. सोमवारी त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारी