शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम केलं म्हणून दिली अघोरी शिक्षा! मुंडण केलं, चपलांचा हार घातला अन् त्याला गावभर फिरवलं; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 16:25 IST

Crime News : एका तरुणाने गावातील एका मुलीवर केलं म्हणून संतप्त झालेल्या लोकांनी त्याचं जबरदस्तीने मुंडण केलं, गळ्यात चपलांचा हार घातला अन् त्याला गावभर फिरवल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असतानाच अनेक भयंकर घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रेम केलं म्हणून एका तरुणाला अघोरी शिक्षा केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने गावातील एका मुलीवर केलं म्हणून संतप्त झालेल्या लोकांनी त्याचं जबरदस्तीने मुंडण केलं, गळ्यात चपलांचा हार घातला अन् त्याला गावभर फिरवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जबलपूरमध्ये ही संतापजनक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी जबलपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे, 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील दमन खामरिया गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. राज कुमार देहरिया या व्यक्तीने हे आरोप केले असून याबाबत तक्रार दाखल केली आहे. देहरिया याने आपल्या तक्रारीत आपलं जबरदस्तीने मुंडण केलं. साखळीने बांधलं, गळ्यात चपलांचा हार घातला आणि संपूर्ण गावात फिरवलं असल्याचं म्हटलं आहे. गावातल्या एका मुलीवर प्रेम होतं. तिच्याच घरच्यांनी हे सर्व घडवून आणल्याचा आरोप तरुणाने केला आहे. तसेच आरोपींनी या घटनेचा एक व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

तरुणाने तरुणीला एक मोबाईल गिफ्ट केला होता. मुलीकडे नवा फोन पाहिल्यावर तिच्या घरच्यांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर त्यांनी राज कुमार देहरियाला आपल्या घरी बोलावलं आणि त्याचं जबरदस्तीने मुंडण केलं अशी माहिती देहरिया याने पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक भयंकर घटना पश्चिम बंगालच्या बर्दवानमध्ये घडली आहे. एकता अल्पवयीन प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 

भयंकर! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावलं प्रेयसीचं लग्न, केली मारहाण

अल्पवयीन मुलगा आणि त्याची प्रेयसी यांचे धर्म वेगवेगळे होते. दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार होते. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. याच कारणावरुन मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला आणि यातूनच मुलानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याआधी या मुलाने आपल्या प्रेयसीला आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर त्यानं व्हॉट्सएपवर प्रेयसीला आपला फोटो देखील पाठवला आणि आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृतदेह गावात आणण्यात आला आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी याप्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना बेदम मारहाण केली. यानंतर दोघींलाही जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आलं. यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगेत कुंकू भरण्यात आलं. शहरातील कांटापुकूर परिसरात हा मुलगा राहत होता. मृताच्या शेजाऱ्यांनी या मुलीला याची कल्पना होती, की मुलगा आत्महत्या करत आहे असं म्हटलं आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिस