धक्कादायक ! महागड्या मोबाईलपायी तरुणाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 23:35 IST2019-02-01T23:35:14+5:302019-02-01T23:35:58+5:30
नदीम शेख (19) असं या तरुणाचं आहे.

धक्कादायक ! महागड्या मोबाईलपायी तरुणाने केली आत्महत्या
मुंबई - कुर्ला येथील नेहरू नगर परिसरात आज खळबळजनक घटना घडली. महागडा मोबाईल घेऊ न दिल्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. नदीम शेख (19) असं या तरुणाचं आहे.
नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या नदीमला नवा मोबाईल विकत घेण्यासाठी त्याच्या मोठ्या भावाने 20 हजार रुपये दिले होते. मात्र, नदीमला 37 हजार रुपयांचाच मोबाईल पाहिजे होता. महागडा मोबाईल घेण्यास भावाने देखील अटकाव केला होता. त्यामुळे निराश झालेल्या नदीमने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.