शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बालगृहात अल्पवयीन मुलाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 18:38 IST

  मुंबई - १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना मानखुर्द येथील बालगृहाच्या परिसरात सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान ...

ठळक मुद्दे बालगृहामधील नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली हा अल्पवयीन मुलगा पुण्याचा असून नेपाळी समाजाचा होता. या घटनेची गोवंडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

 

मुंबई - १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना मानखुर्द येथील बालगृहाच्या परिसरात सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविला असून आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही.मानखुर्दच्या आगरवाडी येथे चिल्ड्रेन्स एड सोसायटीअंतर्गत असलेले बाल कल्याण नगरी हे बालगृह आहे. या बालगृहामधील नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा अल्पवयीन मुलगा पुण्याचा असून नेपाळी समाजाचा होता. या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आईला या मुलाला सांभाळता येत नसल्याने दोन वर्षांपूर्वी त्याला बालगृहात प्रवेश देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तो हळव्या मन:स्थितीत असायचा असे समजते. तो राहत असलेल्या खोलीमधील इतर मुले सोमवारी सायंकाळी अभ्यासासाठी बाहेर गेली होती. बालसुधारगृहातील मुलांच्या झोपण्याच्या खोलीत कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेली दोरी त्याने राहत असलेल्या कुटीरमध्ये छताला बांधून आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्यासोबतची अभ्यासासाठी गेलेली मुले अभ्यास करून परतल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलांनी तत्काळ बालगृहातील कर्मचाऱ्यांना याविषयी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच अधीक्षकांनी गोवंडी पोलिसांना कळवले.पोलिसांनी त्याला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप न समजल्याने याबाबत गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेची गोवंडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

 

 

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीNepalनेपाळPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी