शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
4
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
5
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
6
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
7
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
8
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
9
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
10
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
11
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
12
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
13
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
16
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
17
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
18
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
19
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
20
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अल्पवयीन तरुणीचा महालक्ष्मी रेसकोर्स येथे विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 16:51 IST

आरोपी राहुलला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली

ठळक मुद्देवजन कमी करण्यासाठी पीडित तरुणी महालक्ष्मी रेसकोर्सवर चालण्यासाठी येत असताना राहूलने तिच्याशी लगट करून अश्लील स्पर्श केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. राहुल हा फ्री लान्सर प्रशिक्षक असून तो या ठिकाणी येणाऱ्यांना व्यायाम शिकवत असल्याचे समोर आले आहे. 

मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सवर चालण्यासाठी येणाऱ्या १६ वर्षीय तरुणीचा एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी राहुल परदेशी या फ्री लान्सर प्रशिक्षकाला अटक केली आहे. वजन कमी करण्यासाठी पीडित तरुणी महालक्ष्मी रेसकोर्सवर चालण्यासाठी येत असताना राहूलने तिच्याशी लगट करून अश्लील स्पर्श केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. आरोपी राहुलला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली असल्याची माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फिरोझ बागवान यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. राहुल हा फ्री लान्सर प्रशिक्षक असून तो या ठिकाणी येणाऱ्यांना व्यायाम शिकवत असल्याचे समोर आले आहे. सातरस्ता परिसरात राहणारी तरुणी नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली. ती गेल्या आठवड्यापासून दररोज चालण्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सवर येत असे. काही दिवसांपासून पाठलाग करून राहुलने काही ना काही कारणं सांगून तिच्याशी बतावणी मारून तू वजन कमी करण्यासाठी करत असलेले व्यायामाचे प्रकार चुकीचे आहेत.  तुझी चालण्याची पद्धत देखील चुकीचे असल्याचे सांगून राहुलने व्यायामाचे प्रशिक्षण देण्याचा बहाणा केला. त्याच बहाण्याने त्याने या मुलीच्या अंगाला अनेक ठिकाणी अश्लील स्पर्श केला. तिने हा प्रकार घरी सांगितल्यावर कुटुंबीयांनी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक फिरोझ बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेकवडे आणि बजरंग जगताप यांच्या पथकाने दोन दिवसांच्या सलग तपासानंतर राहुल याला शोधून काढले.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई