मंगळुरू - कर्नाटकातील मंगळुरू येथील आमटडी येथे एका १६ वर्षीय मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. सूत्रांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काही पुरावा गोळा केला आहे.एफआयआरनुसार, मुलगी शुक्रवारी सकाळी ७ वाजता घरून शाळेकडे जात असताना कारमधून आलेल्या एका व्यक्तीने आणि त्याच्या साथीदारांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यासोबत दुष्कृत्य केले. पीडितेला शहरातील लेडी गोसचेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीसूत्रांनी सांगितले की, हे देखील कळले आहे की, गुन्हेगारांनी मुलीला बहम्रकूलटू येथे आणले आणि दुष्कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी बंटवाल पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
धक्कादायक! शाळेत जात असताना विद्यार्थिंनीला नराधमांनी अडवलं अन् तिचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 21:37 IST
Gangrape Case : अल्पवयीन मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.
धक्कादायक! शाळेत जात असताना विद्यार्थिंनीला नराधमांनी अडवलं अन् तिचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं
ठळक मुद्देपीडितेला शहरातील लेडी गोसचेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.