Shocking! Vulgar video call to a naval officer's wife | धक्कादायक! नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ कॉल
धक्कादायक! नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ कॉल

ठळक मुद्दे३६ वर्षीय रविकांत तिवारीला कफपरेड पोलिसांनी अटक केली आहे.कफपरेड परिसरात तक्रारदार महिला राहते. तिवारीने त्यांना व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केले.

मुंबई - नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीला अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या ३६ वर्षीय रविकांत तिवारीला कफपरेड पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून दोन मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत.
कफपरेड परिसरात तक्रारदार महिला राहते. तिवारीने त्यांना व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे केले. त्यांनी याबाबत पतीला कळविले. पोलिसांनी मोबाइल क्रमांकावरून तपास सुरू केला. सुरुवातीला तो क्रमांक छवी राठोर नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजले. पुढे तो क्रमांक विलेपार्लेच्या ओम लॉजिस्टिकच्या नावाने नोंद असल्याची माहिती पथकाला मिळाली. अखेर, चौकशीत तो क्रमांक तिवारी वापरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिवारीला अटक केली.


Web Title: Shocking! Vulgar video call to a naval officer's wife
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.