धक्कादायक! विरारमध्ये आईने मुलासह केली आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 17:30 IST2019-05-11T17:28:25+5:302019-05-11T17:30:45+5:30
विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

धक्कादायक! विरारमध्ये आईने मुलासह केली आत्महत्या?
विरार - विरारच्या नारंगी परिसरातील एका फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री ४२ वर्षीय महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. संजीवनी चौगुले (४२) आणि विनोद (२५) अशी मृतांची नावे आहेत. दोघांनी विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
विरार पूर्वेला नारंगी येथे साई हेरीटेज इमारतीत संजीवनी आणि त्यांचा मुलगा विनोद भाडयाच्या घरात रहात होते. आई आणि मुलगा सकाळपासून गायब असल्याने शेजाऱ्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली. विनोद विरारमधल्या एका स्थानिक क्लबकडून क्रिकेट खेळायचा. मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला ते लवकरच स्पष्ट होईल, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आई आणि मुलगा दोघे आर्थिक अडचणीला तोंड देत होते. विनोद पार्ट टाईम नोकरी देखील करायचा. मात्र, कर्जाची परतफेड करणे मायलेकाला जमत नव्हते. पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.