शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! एमआरआय काढण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा कपडे बदलताना व्हिडिओ काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 12:01 IST

पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वार्ड बॉयला केली अटक कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वार्ड बॉयला अटक केली आहे.लकेश लहू उत्तेकर (वय २५, रा़ भैरवनगर, धानोरी, मुळ गाव रत्नागिरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्या जंहागीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या़  हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना एमआरआय काढण्यास सांगितले. त्यानुसार ही महिला शनिवारी रात्री ९ वाजता एमआरआय काढण्यासाठी वॉर्डातून तळमजल्यावर आल्या होत्या़. या महिलेला चेंजिंग रुममध्ये कपडे बदलण्याऐवजी दुसऱ्या खोलीत कपडे बदला असे लकेश उत्तरेकर याने सांगितले. त्यानंतर ही महिला एमआयआय करुन आली. तेव्हा परत दुसऱ्या खोलीत कपडे बदल्यास सांगण्यात आले.ही महिला जेव्हा कपडे बदलू लागली तेव्हा तेथे तिला एक मोबाईल दिसला. तिने मोबाईल पाहिला तर त्यात ती कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला होता. ही गोष्ट या महिलेने आपल्या पतीला सांगितली. तिच्या पतीने याबाबत हॉस्पिटल प्रशासनाकडे चौकशी केल्यावर त्यांनी वार्ड बॉयला बोलवून जाब विचारला. त्यांनी १०० क्रमांकावर फोन करुन पोलिसांना कळविले. ही माहिती मिळताच कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहचले व त्यांनी वार्ड बॉयला ताब्यात घेतले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात येऊन वार्ड बॉयला अटक करण्यात आली आहे़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलWomenमहिला