शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

धक्कादायक! चालत्या कारमध्ये तरुणावर त्रिकुटाने केला अनैसर्गिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 6:48 PM

याबाबत व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्दे २४ तासांत पोलिसांनी मेहुल परमार (२१), असिफ अली अन्सारी (२३) आणि पियुष चौहान (२२) या तिघांना अटक केली आहे. या त्रिकुटाला १६ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यात वापरलेली स्कुटी (एमएच ०३; डीएच १३२४) आणि टोयोटो कोरोला कार (एमएच ०४; बीडब्ल्यू ५५४८) पोलिसांनी हस्तगत केली आहे. 

मुंबई - संपूर्ण देश हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या तसेच उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाने हादरून गेला असताना मुंबईत ८ डिसेंबरला अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या कारमध्ये २२ वर्षीय तरुणावर तिघांना अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्याच्याजवळील पैसे काढून घेऊन त्याला मारहाण केली. तसेच पळ काढत आरोपींनी पीडित तरुणाला गाडीबाहेर रस्त्यावर ढकलून दिले. याबाबत व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून २४ तासांत पोलिसांनी मेहुल परमार (२१), असिफ अली अन्सारी (२३) आणि पियुष चौहान (२२) या तिघांना अटक केली आहे. या त्रिकुटाला १६ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 

८ डिसेंबरला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास २२ वर्षीय तरुण कुर्ला पश्चिम येथील नवाब शीख पराठा येथे शीख कबाब खाण्यासाठी थांबला होता. त्यावेळी एका स्कुटीवरून दोन इसम आले आणि त्यांनी पीडित २२ वर्षीय तरुणाला आम्ही तुला इंस्टाग्रामी या सोशल मीडियाद्वारे ओळखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला सोबत येण्याची विनंती केली. २२ वर्षीय तरुण त्यांच्या स्कुटीवर दोघांच्या मध्ये बसला आणि तिघेही निघाले. ते श्रद्धा जंक्शनमार्गे होलीस्पिरीट  शाळेकडून विद्याविहारकडे निघाले असता २२ वर्षीय तरुणाने गाडीवरून उतरण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, दोघांनी उतरू दिले नाही. पुढे ते विद्याविहार रेल्वे स्थानकानजीक असलेल्या नीलकंठ बिझनेस पार्कजवळ घेऊन गेले. त्याठिकाणी एक पांढऱ्या रंगाची टोयोटो कोरोला कार उभी होती. या कारमध्ये एक इसम अगोदरपासून बसून होता. स्कुटीवरून घेऊन आलेल्या २२ वर्षीय तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि आळीपाळीने तिघांनी अनैसर्गिक संभोग केला. त्यानंतर चौथा इसम आला आणि तो कार चालवू लागला.

चालत्या कारमध्ये असताना तिघांनी  त्याच्याजवळील मोबाईल, पर्स काढून घेतले. त्यानंतर महिंद्रा पार्क येथील पेट्रोल पंपावर जाऊन पीडित तरुणाचे क्रेडिट कार्डवरून २ हजार रुपयांचे पेट्रोल भरले आणि २ हजार रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर पीडितेला मारहाण करून मोबाईल आणि पाकीट परत देऊन गाडीबाहेर ढकलून दिले. पीडित तरुणाने १०० क्रमांकावर फोन करून मदतीसाठी पाचारण केले. तात्काळ पोलीस घटनास्थळी आले आणि पिडिताला घाटकोपर पोलीस ठाण्यात नेले. गुन्हा घडलेले ठिकाण व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तो पुढील तपासकामी व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात वर्ग केला. हा गुन्हा भा. दं. वि. कलम ३७७, ३९२, ३२३, ५०४, ३४ अन्वये दाखल केला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबी तपासून तिन्ही आरोपींना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली स्कुटी (एमएच ०३; डीएच १३२४) आणि टोयोटो कोरोला कार (एमएच ०४; बीडब्ल्यू ५५४८) पोलिसांनी हस्तगत केली आहे. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणRobberyचोरीArrestअटकPoliceपोलिसKurlaकुर्ला