पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 21:23 IST2019-03-18T21:21:06+5:302019-03-18T21:23:43+5:30
मोहम्मद नाझीर खान (४६) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार; आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई - पोलीस ठाण्यातील काचेची खिडकी तोडून काचेच्या तुकड्याने गळ्यावर सपासप वार करून एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चुनाभट्टी पोलीस ठाण्यात घडली. मोहम्मद नाझीर खान (४६) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चुनभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी खान याला शुक्रवारी अटक केली होती. अटकेनंतर शनिवारी सकाळी त्याला पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील गुन्हे प्रकटीकरण कक्षामध्ये चौकशीसाठी बसविण्यात आले होते. दुपारी त्याने गुन्हे प्रकटीकरण कक्षातील खिडकीची काच फोडून काचेच्या तुकड्याने त्याने स्वत:च्या गळ्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच खान याच्या हातातील काचेचा तुकडा हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.