शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भिवंडीत एक माथेफेरूने केलेल्या हल्ल्यात दोनजणांचा मृत्यू तर चारजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 19:38 IST

Crime News : अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणाऱ्या माथेफेरूचे नाव असून या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम ( वय ४२ )व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान ( वय २९) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

भिवंडी -  शहरातील शांतीनगर परिसरातील खान कंपाऊंड गैबी नगर येथील रहेमनीया मस्जिद परिसरातील एका चाळीत राहणाऱ्या परिवारावर शुक्रवारी एका माथेफेरूने केलेल्या चाकू हल्ल्यात दोघा जणांची हत्या झाली असून चार जण जखमी आहेत त्यामध्ये जखमींमध्ये मयताची पत्नी व तीन मुलांचा समावेश आहे . या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. अन्सार उलहक्क अन्सारी असे हल्ला करणाऱ्या माथेफेरूचे नाव असून या हल्ल्यात कमरुजमा मोहम्मद इस्लाम ( वय ४२ )व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान ( वय २९) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

माथेफेरू आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी याने कमरुजम्मा मोहम्मद इस्लाम अन्सारी याच्या घरात शिरून चाकूने त्यावर हल्ला केला असता घरातील आरडाओरडा नंतर शेजारी राहणारा इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर हा त्या ठिकाणी आला. माथेफेरूने त्यावर व घरातील कमरुजमा ची पत्नी हसीनाबानो, मुले रेहान, आरिफा व आरीबा यांच्यावर सुध्दा चाकू हल्ला करीत सर्वांना जखमी करीत रक्तबंबाळ केले .या गदारोळा नंतर परिसरातील नागरीक धावून येत त्यांनी हल्लेखोर आरोपी अन्सार उलहक्क अन्सारी यास पकडून ठेवत या घटनेची माहिती शांतीनगर पोलिसांना दिली असता पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत नागरीकांनी सर्व जखमींना स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी कमरुजमा मोहम्मद इस्लाम व इम्तियाज अहमद मोहम्मद जुबेर खान हे मयत झाल्याचे घोषित केले तर जखमी पत्नी व मुलांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात रवाना केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटक