धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 07:03 PM2020-03-02T19:03:32+5:302020-03-02T22:51:59+5:30

उलवेतला प्रकार : पुर्वनियोजीत कट असल्याचा संशय; कारसह पळवले महिलेला

Shocking! Thieves stolen a car with a woman and shot gun her pda | धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी 

धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी 

Next

नवी मुंबई : कारमध्ये बसलेल्या महिलेचे अपहरण करुन तिची हत्या केल्याचा प्रकार उलवेत घडला आहे. बँकेच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये महिला एकटी बसलेली असताना हा प्रकार घडला. घटनास्थळापासून काही अंतरावरच कार व अपहृत महिला जखमी अवस्थेत आढळली. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

उलवे सेक्टर 19 परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शेलघर गावच्या प्रभावती बाळकृष्ण भगत (55) ह्या त्यांच्या मुलासह उलवे परिसरात आल्या होत्या. यावेळी त्यांचा मुलगा रस्त्यालगत कार उभी करुन एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. त्या कारमध्येच बसल्या होत्या. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने कारसह प्रभावती यांचे अपहरण केले.

शोधाशोध केली असता काही अंतरावरच कार आढळली. आतमध्ये प्रभावती ह्या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या गळ्यावर वरुन खालच्या दिशेने गोळी झाडण्यात आलेली होती. यामध्ये त्या गंभीर जखमी झालेल्या असल्याने त्यांना तात्काळ नेरुळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनआरआय व गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तपासाला सुरवात केली. परंतु त्या प्रभावती यांचे अपहरण करुन गोळी झाडणारया अज्ञात व्यक्तीविषयी पोलिसांना माहिती कळू शकलेली नाही.

या घटनेप्रकरणी रात्री उशीरापर्यंत एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ही घटना लुटीच्या उद्देशाने झाल्याचे बोलले जात आहे. प्रभावती यांच्या अंगावरील दागिणे तसेच असल्याने त्यांच्या हत्येचा पुर्वनियोजित कट असल्याचाही संशय बळावला आहे. त्यानुसार पोलिसांकडून सर्व बाजुने तपासावर जोर देण्यात आला आहे. त्याकरिता घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत.

Web Title: Shocking! Thieves stolen a car with a woman and shot gun her pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.